सांगोला शहरात साप सापडण्याचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:16 AM2020-12-07T04:16:08+5:302020-12-07T04:16:08+5:30
अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने नद्या, नाले, ओढ्यातून पुराचे पाणी वाहून गेले. पुराच्या पाण्यामुळे शेतात वास्तव्य केलेले व नद्या-नाले ओढ्यातून ...
अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने नद्या, नाले, ओढ्यातून पुराचे पाणी वाहून गेले. पुराच्या पाण्यामुळे शेतात वास्तव्य केलेले व नद्या-नाले ओढ्यातून विविध प्रकारचे विषारी साप बाहेर पडले आहेत. यातच थंडी वाढल्यामुळे साप अडगळीची ठिकाणे, बाग, जिना, बुट, दुचाकी, चारचाकी, ड्रेनेज पाईप आदी ठिकाणी आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोट :::::::::::::::::::::::::
ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे शेतात अद्यापही पाणी आहे. नद्या, ओढे, नाल्यातून पाणी वाहत असल्यामुळे बिळामधून साप बाहेर पडत आहेत. अशा विषारी व बिनविषारी सापांनी आता शहराचा आश्रय घेतला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, त्यांना इजा न करता जवळच्या सर्पमित्रांशी संपर्क साधावा.
- संदेश पलसे
सर्पमित्र, सांगोला
फोटो ओळ
सर्पमित्र संदेश पलसे यांनी शिवाजी चौक (सांगोला) येथील कळसे वाड्यातून विषारी नाग पकडल्याचे छायाचित्र.