बार्शी तालुक्यात लसधारकांचा आकडा पावणेदोन लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:26 AM2021-09-12T04:26:54+5:302021-09-12T04:26:54+5:30

बार्शी शहरातील लिंगायत बोर्डिंग येथील लसीकरण केंद्रावर आमदार राजेंद्र राऊत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी बार्शी शहर व तालुक्यात ...

The number of vaccinators in Barshi taluka is over two and a half lakh | बार्शी तालुक्यात लसधारकांचा आकडा पावणेदोन लाखांवर

बार्शी तालुक्यात लसधारकांचा आकडा पावणेदोन लाखांवर

Next

बार्शी शहरातील लिंगायत बोर्डिंग येथील लसीकरण केंद्रावर आमदार राजेंद्र राऊत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी बार्शी शहर व तालुक्यात १ लाख ४० हजार नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला. शनिवारी दिलेले ३० हजार डोस असे मिळून १ लाख ७० हजार नागरिकांना कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण झाले. नोव्हेंबर २०२१ अखेरपर्यंत २ लाख ६६ हजार नागरिकांचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. महसूल, आरोग्य, नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी नगरसेवक विलास रेणके, प्रशांत कथले, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, आप्पासाहेब गुडे उपस्थित होते.

----११बार्शी-लस

बार्शीत लसीकरण केंद्रांना भेट देऊन आमदार राजेंद्र राऊत यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे व नागरिकांचे मनोधैर्य वाढविले.

110921\1627-img-20210911-wa0012.jpg

लसीकरण

Web Title: The number of vaccinators in Barshi taluka is over two and a half lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.