‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना दिली शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:19 AM2021-01-02T04:19:09+5:302021-01-02T04:19:09+5:30
यावेळी पक्षनेते अनिल अंभगराव, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, ...
यावेळी पक्षनेते अनिल अंभगराव, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर उपस्थित होते. माझी वसुंधरा हे अभियान शासन संपूर्ण महाराष्ट्रात राबवित आहे. याची संकल्पना व माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली. संपूर्ण पंढरपूर हरित व्हावे या हेतूने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे व भविष्यातही करण्यात येत आहे. निसर्गाचा समतोल राखावा, पंढरपूर प्रदूषणमुक्त राहावे, यासाठी माझी वसंधुरा अभियान सर्वांपर्यंत पोहोचवावे, असे आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते धर्मराज घोडके, नवनाथ रानगट, गुरू दोडिया, बाळासाहेब थोपटे, किरण मंजूळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील वाळूजकर यांनी केले, तर विवेक परदेशी यांनी आभार मानले.