'पुलाखालून पाणी वाहत असताना शरद पवार शांत का होते? लक्ष्मण हाकेंनी थेट पवारांना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 01:48 PM2024-08-14T13:48:07+5:302024-08-14T13:48:48+5:30

Laxman Hake On Sharad Pawar :ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी खासदार शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत.

OBC leader Laxman Hake criticized MP Sharad Pawar | 'पुलाखालून पाणी वाहत असताना शरद पवार शांत का होते? लक्ष्मण हाकेंनी थेट पवारांना डिवचलं

'पुलाखालून पाणी वाहत असताना शरद पवार शांत का होते? लक्ष्मण हाकेंनी थेट पवारांना डिवचलं

Laxman Hake On Sharad Pawar ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर आंदोलन करत ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. दरम्यान, ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केलाय. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. खासदार शरद पवार यांनी ओबीसी आणि मराठा नेत्यांना एकत्र आणून बैठक घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आता यावरुन ओबीसी लक्ष्मण हाके यांनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली. हाके यांनी आज पुंढरपूरात 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आरोप केले. 

मोठी बातमी: काँग्रेसचे दोन आमदार रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांना भेटले, लवकरच पक्षप्रवेश?

"पवार साहेबांचं अशा पद्धतीच आव्हान म्हणजे लबाडा घरचं आमंत्रण आहे. गेल्या दोन वर्षापासून सर्व पक्षीय बैठका घ्या आणि ओबीसी आरक्षणावर मार्ग काढा अशा पद्धतीचं वक्तव्य शरद पवार साहेब आणि अन्य बरीच मंडळी करत आहेत.पण, जरांगेंना राज्यात कुणी तयार केलं? यावर पवार साहेबांनी उत्तर द्यावं, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी केला.

"जरांगे नावाचा व्यक्ती राजकारण, समाजकारण आणि समाजाला प्रचंड त्रासाचे ठरणार आहेत. सध्या ग्रामीण भागातील वातावरण बिघडलं आहे. आता पवार साहेबांनी वातावरण एवढं बिघडल्यानंतर बोलणे म्हणजे म्हातारपणी शिंगार केला जाणे. वर्षभर पवार साहेब तुम्ही काय करत आहात? वर्षभर बीड शहर जळत आहे, तुम्ही या वातावरणाचा फायदा घेऊन तुम्ही माणस निवडून देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुम्ही राजकीय पोळी शेकली, असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला. 'आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आता तुम्हाला असंल शहानपण सुचलं आहे, पवार साहेब तुम्ही पुरोगामी नेते आहेत. तुम्ही मागासलेपण समाजावर बोला, असंही हाके म्हणाले. 

'मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी'

"आम्ही अशा बैठकीला निश्चित जाऊ, आम्ही कायद्याची भाषा बोलू. आम्ही समाजावर बोलू. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, यासाठी कोणतीही लढाई लढायला तयार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आधी एकट्याने लढावे. ते फक्त २८८ उमेदवारांच बोलतात. परत ते रिमोट कंट्रोलवाल्या नेत्यांना पाठिंबा देतील. जरांगे सारखा माणूस दर दहा मिनिटाला आपली भूमिका बदलत असतो, असा निशाणा लक्ष्मण हाके यांनी साधला. 

Web Title: OBC leader Laxman Hake criticized MP Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.