आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:15 AM2021-06-27T04:15:39+5:302021-06-27T04:15:39+5:30
ओबीसीचे स्थानिक स्वराज संस्थांमध्ये राजकीय आरक्षण कायम ठेवण्यासाठी सांगोला तालुका भाजपतर्फे जुनोनी (ता. सांगोला) येथे २६ जून रोजी रास्ता ...
ओबीसीचे स्थानिक स्वराज संस्थांमध्ये राजकीय आरक्षण कायम ठेवण्यासाठी सांगोला तालुका भाजपतर्फे जुनोनी (ता. सांगोला) येथे २६ जून रोजी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे हायवेच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवाजी आलदर, मागासवर्गीय मोर्चाचे तालुकाध्यक्ष तानाजी कांबळे, युवा मोर्चा अध्यक्ष दुर्वा हिप्परकर, एन. वाय. भोसले, अभिमन्यू पवार, विलास व्हनमाने, माणिक सकट, उमेश मंडले, दीपक केदार, राहुल मंडले, राहुल होनमाने, दिलीप कोळेकर, संभाजी गोडसे, बाळासाहेब कोळेकर, अमोल मोहिते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाचे प्रश्न व हक्क याबाबत दुर्लक्ष करत आहे. वारंवार केलेल्या विनंत्या, निवेदने यावर तोंडी आश्वासने देऊन आवश्यक ती पावले मात्र उचलताना दिसत नाहीत. नाईलाजास्तव ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन करावे लागत आहे. आघाडी सरकारने मराठा समाजाचा घात केला. ओबीसी समाजाची आघाडी सरकारने फसवणूक केल्याचा आरोप चेतनसिंह केदार-सावंत यांनी केला. यावेळी भाजपतर्फे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, महसूल विभागास निवेदन देण्यात आले.
फोटो ओळ ::::::::::::::::::::::
ओबीसी राजकीय आरक्षण कायम राहावे यासाठी भाजपतर्फे जुनोनी येथे रास्ता रोको आंदोलन करून पोलिसांना निवेदन दिले.