The object was lost, stolen? Make online complaint, Hi-tech mechanism of Solapur city police
वस्तु हरवली , चोरली गेली ? करा आॅनलाईन तक्रार, सोलापूर शहर पोलीसांची हायटेक यंत्रणा
By admin | Published: July 13, 2017 03:09 PM2017-07-13T15:09:19+5:302017-07-13T15:09:19+5:30
-
Next
आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि १३ : नागरिकांची वस्तु हरवली किंवा चोरीला गेली त्यासाठी पोलीस ठाण्यांत तक्रार करावी लागत असे. मात्र पोलीस आयुक्तालयाच्या वेब साईट वरुन आॅन लाईन तक्रार करण्यांसाठी सोलापूर शहर पोलीसांनी आता नव्याने टॅब ची व्यवस्था करून दिली आहे़ यामुळे नागरिकांना घरबसल्या तक्रार करणे सोईचे होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती. पोलीस आयुक्त सोलापूर शहर या संकेतस्थळावर दोन नवीन टॅब देण्यात आलेले असून सदर टॅबच्या माध्यमातुन नागरिकांना सोलापूर पोलीस यांच्या संकेतस्थळावरुन स्मार्ट पोलिसिंगच्या दृष्टीकोनातुन दोन अद्यावत टॅप (हरवलेले अगर मिळून आलेले वस्तु), (हभोडकरुची माहिती) हे पोलीस आयुक्तालय ठाणे व पुणे यानंतर सोलापुर शहरात सुरु करण्यात आली आहे. या टॅबच्या माध्यमातुन नागरिकांना विविध महत्वाचे वस्तु/ साहित्य/ कागदपत्रे, हरवलेले अगर मिळून आल्यानंतर पोलीस ठाण्यात न जाता संकेतस्थळावर आॅनलाईन पध्दतीने तक्रार दाखल करता येणार आहे. संबधीत तक्रार भरतांना तक्रारादास मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त झाल्यानंतर भरणे अनिवाय आहे. संबधीत तक्रार पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्त कार्यालयास तात्काळ ई मेलव्दारे प्राप्त होईल. त्यानंतर पोलीस पुढील कारवाई करतील. तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारादास त्याच्या ई - मेल आयडीवर हरवलेले वस्तु, साहित्य कागदपत्रे यांची डिजीटल सिग्नेचरचे प्रत तक्रारदाराच्या ई मेलवर आयडीवर तात्काळ प्राप्त होणार आहे. सदर तक्रारीची प्रत ही नव्याने अथवा (डयुप्लीकेट) कागदपत्र काढण्याकरीता वापरता येणार नाही. सद्याचे डिजीटल युगामध्ये कामकाज आॅनलाईन झाल्याने नागरिकांना वेळीची बचत होईल. नागरिक आणि पोलीस यांच्यात पारदर्शकता येणार असल्याचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितले. ------------------------- घरमालकांना भाडेकरुची माहिती द्या नाहीतर कारवाई साधा सरळ वाटणाऱ्या तुमच्या भाडेकरूची तुम्ही शहानिशा केली काय, केली नसेल तर करून घ्या. त्याची संपूर्ण माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्या. तुम्ही हलगर्जीपणा दाखवला अन तुमचा भाडेकरू एखादा गुन्हेगार निघाला तर तुमच्यावर नाहक पोलीस कोठडीत जाण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी घरमालकांनी पोलीस ठाण्याला न जाता संकेतस्थळाच्या माध्यमातुन आॅनलाईन पध्दतीने एका क्लिकवर देता येणार आहे. भाडेकरुबद्दलची माहिती संबधीत पोलीस ठाण्याला कळविणे हे बंधनकारक आहे. ३ील्लंल्ल३ ्रल्लाङ्म टॅब मध्ये घरमालक फॉर्म भरु शकतो त्यामध्ये घरमालक , प्रॉपर्टी तसेच भाडेकरुचे संपुर्ण माहिती भरावी लागेल. त्यानंतर घरमालकाच्या मोबाईलवर येईल़
Web Title: The object was lost, stolen? Make online complaint, Hi-tech mechanism of Solapur city police