अंगण झाडणाऱ्या महिलेशी अश्लील वर्तन; जुन्या भांडणातून केले कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:23 AM2021-09-18T04:23:39+5:302021-09-18T04:23:39+5:30

बार्शी : तालुक्यातील एका गावात महिला तिच्या घरासमोरील झाडलोट करताना, एका ओळखीच्या इसमाने जुन्या भांडणाचा राग ...

Obscene behavior with a woman sweeping the yard; Acts made out of old quarrels | अंगण झाडणाऱ्या महिलेशी अश्लील वर्तन; जुन्या भांडणातून केले कृत्य

अंगण झाडणाऱ्या महिलेशी अश्लील वर्तन; जुन्या भांडणातून केले कृत्य

Next

बार्शी : तालुक्यातील एका गावात महिला तिच्या घरासमोरील झाडलोट करताना, एका ओळखीच्या इसमाने जुन्या भांडणाचा राग मनात धरून तिच्याशी अश्लील वर्तन करून काठीने मारहाण केली. १६ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. गुरुवारी रात्री उशिरा बार्शी तालुका पोलिसात तक्रार देताच, दत्ता नानासाहेब गव्हाणे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील पीडित महिला गुरुवारी नेहमीप्रमाणे घरासमोरील शेण झाडलोट करत होती. त्यावेळी त्याने तेथे येऊन जुन्या भांडणाचा राग मनात धरून पीडित महिलेशी असभ्य वर्तन केले. तिला शिवीगाळ दमदाटी व लाकडी काठीने डाव्या व उजव्या हातावर मारहाण करून जखमी केले. याबद्दल तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला आहे. तपास हवालदार एच.एम. वाघमोडे करत आहेत.

----

Web Title: Obscene behavior with a woman sweeping the yard; Acts made out of old quarrels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.