अडीअडचणी, तक्रारीवर चर्चा करून वीज बिल भरण्यासाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:23 AM2021-03-10T04:23:18+5:302021-03-10T04:23:18+5:30
कचरेवाडी (ता. माळशिरस) येथे महावितरणने कृषी मेळावा घेत शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. यावेळी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव ...
कचरेवाडी (ता. माळशिरस) येथे महावितरणने कृषी मेळावा घेत शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. यावेळी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता अकलूज अनिल वडार आदी उपस्थित होते. वीज बिल भरण्यासाठी शेती पंपाचे कनेक्शन कट करणे, शेतकऱ्यांना वेठीस धरणे अशा प्रकारांना बगल देत महावितरणने ऊर्जा पर्वातील १८ कलमी कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये विविध प्रकारे नागरिकांशी संवाद साधला जात आहे. यावेळी जागृती योजनेची माहिती, फायदे व इतर गोष्टींबरोबर शेतकऱ्यांना कृषी धोरण २०२० आदीबाबत माहिती देण्यात आली. तसेच नवीन कनेक्शन, सोलर या विषयी माहिती देण्यात आली.
यावेळी उपकार्यकरी अभियंता, प्रवीण कुंभारे, प्रदीप सुरवसे, सुरेश वसेकर, सह अभियंता एस. पी. रजपूत, डॉ. मारुती पाटील, तुळशीराम सिद, संतोष कुलकणी, ॲड. सोमनाथ वाघमोडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यात ४४ कोटींची वीज बिल थकबाकी आहे. याचा ३० शेतकऱ्यांनी १०० टक्के लाभ घेतला. यावेळी त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. नवीन कनेक्शन मागणी केलेल्या ८६ ठिकाणी कनेक्शन दिले. २०१५ पूर्वीचे दंड, व्याज व मुद्दलामध्ये ५० टक्के सवलत मार्च २०२२ पर्यंत ही रक्कम भरता येते. सप्टेंबर २० नंतरची वीज देयके भरणे क्रमप्राप्त आहे.
फोटो ::::::::::::::::::::::
कचरेवाडी (ता. माळशिरस) येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना महावितरणचे अधिकारी व अन्य.