कारवाईत अडथळा; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:24 AM2021-02-09T04:24:52+5:302021-02-09T04:24:52+5:30

अरूण महादेव मेटकरी, भैय्या उर्फ केशव शिवाजी मासाळ, परमेश्वर कृष्णा खरात, कर्णेश्वर कृष्णा खरात यांच्याविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, ...

Obstruction of action; Filed charges against five people | कारवाईत अडथळा; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

कारवाईत अडथळा; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Next

अरूण महादेव मेटकरी, भैय्या उर्फ केशव शिवाजी मासाळ, परमेश्वर कृष्णा खरात, कर्णेश्वर कृष्णा खरात यांच्याविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, वाळू चोरी करणे व पर्यावणाचा ऱ्हास करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ७ फेब्रुवारी रोजी रात्री १२.४५ च्या दरम्यान गुंजेगाव व महमदाबाद-शेटफळ येथील माण नदीपात्रातून बिगर नंबरचा टेम्पो चोरून एक ब्रास वाळू घेवून जात असताना मंडल अधिकारी उल्हास जनार्धन पोलके व कोतवालांनी पकडला. कारवाईसाठी तो टेम्पो घेऊन जाताना त्यांनी कोतवालास धमकी देवून शिवीगाळ करत धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतची फिर्याद मारापूर मंडलाधिकारी यांनी दिली आहे. पोलिसांनी टेम्पोसह १ लाख ४३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Obstruction of action; Filed charges against five people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.