कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूरातील पांडुरंगाचे २४ तास दर्शन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 06:40 PM2017-10-23T18:40:25+5:302017-10-23T18:42:49+5:30

३१ आॅक्टोबर रोजी कार्तिकी यात्रा सोहळा असल्याने सध्या पंढरीत भाविकांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे रविवारपासून आॅनलाईन दर्शन बंद करून २४ तास दर्शन सुरू ठेवले आहे़ 

On the occasion of Kartika Yatra, Panduranga's Pandharanga's 24-hour exhibition begins | कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूरातील पांडुरंगाचे २४ तास दर्शन सुरू

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूरातील पांडुरंगाचे २४ तास दर्शन सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देव्हीआयपी दर्शन बंद होणारचंद्रभागा नदीत मुबलक पाणीसाठाभाविकांचे दर्शन सुलभ होणार


आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि २३ : ३१ आॅक्टोबर रोजी कार्तिकी यात्रा सोहळा असल्याने सध्या पंढरीत भाविकांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे रविवारपासून आॅनलाईन दर्शन बंद करून २४ तास दर्शन सुरू ठेवले आहे़ 
रविवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक रवींद्र वाळूजकर, नित्योपचार प्रमुख हणमंत ताटे यांच्या हस्ते श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेचे नित्योपचार व पूजा करण्यात आली़ त्यानंतर देवास लोढ देऊन पलंगही काढण्यात आला आहे़ आता २५ आॅक्टोबरपासून व्हीआयपी दर्शन पासही बंद करण्यात येणार आहे़ 
दिवाळी सुटी आणि कार्तिकी यात्रा सोहळ्यानिमित्त पंढरीत येणाºया भाविकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे़ सध्या चंद्रभागा पात्रातील पुंडलिक मंदिर अजूनही पाण्याखाली आहे़ भरपूर पाणी असल्याने भाविकही पवित्र स्नान करताना दिसून येत आहेत़ स्नान झाल्यानंतर दर्शनरांगेतून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शन घेत आहेत़ दर्शन रांग कासारघाटाच्या पुढे गेली असून ती दिवसेन्दिवस वाढतच आहे़ त्यामुळेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने २२ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत आॅनलाईन दर्शन बंद करून २४ तास दर्शन सुरू ठेवले आहे़ त्यामुळे आता भाविकांना दर्शन घेणे सोयीचे झाले आहे़ 



 

Web Title: On the occasion of Kartika Yatra, Panduranga's Pandharanga's 24-hour exhibition begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.