‘उत्तर’च्या नायब तहसीलदारावर गुन्हा

By admin | Published: June 14, 2014 01:36 AM2014-06-14T01:36:49+5:302014-06-14T01:36:49+5:30

सोलापूर : पदवीधर व शिक्षक मतदार निवडणूक कामासाठी नियुक्ती केली

Offenders' answer to taheelsildar | ‘उत्तर’च्या नायब तहसीलदारावर गुन्हा

‘उत्तर’च्या नायब तहसीलदारावर गुन्हा

Next


सोलापूर : पदवीधर व शिक्षक मतदार निवडणूक कामासाठी नियुक्ती केली असताना या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी उत्तर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार उषाबाई डी़ जाधव यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे़
याबाबत निवृत्ती ज्ञानदेव लांडगे (वय ३८,रा़बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, उपविभागीय अधिकारी (क्र.१)यांनी जाधव यांची पदवीधर व शिक्षक मतदार निवडणूक(२०१४) कामासाठी २१ मे पासून नियुक्ती केल्याचा आदेश काढला होता; मात्र त्या ११ जूनपर्यंत निवडणुकीचे कामच केले नाही़ याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी २६ मे रोजी खुलासा मागितला़ तोही दिला नाही़ त्यानंतर ६ जून रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली़ त्यालाही खुलासा दिला नाही़ अखेर गुन्हा दाखल झाला़

Web Title: Offenders' answer to taheelsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.