अल्पवयीन बालिकेशी अपरात्री असभ्य वर्तन, तरुणाविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा
By शीतलकुमार कांबळे | Updated: May 16, 2024 19:53 IST2024-05-16T19:53:41+5:302024-05-16T19:53:57+5:30
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील अल्पवयीन बालिका शहरातील एका नगरात आपल्या नातलगासमवेत वास्तव्यास आहे. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास नमूद आरोपीने पिडित बालिकेला मेसेस करुन घराबाहेर बोलावून घेतले.

अल्पवयीन बालिकेशी अपरात्री असभ्य वर्तन, तरुणाविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा
सोलापूर : अपरात्री जबरदस्तीने घरात बोलावून घेऊन अल्पवयीन बालकेशी असभ्य वर्तन करणाऱ्या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा नोंदला आहे. हा प्रकार शहरातील एका नगरात मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास घडला. हारुन शब्बीर शेख (वय २२, रा.सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील अल्पवयीन बालिका शहरातील एका नगरात आपल्या नातलगासमवेत वास्तव्यास आहे. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास नमूद आरोपीने पिडित बालिकेला मेसेस करुन घराबाहेर बोलावून घेतले. घरी कोणी नसल्याचे सांगून जबरदस्तीने घरामध्ये नेले. तिच्याशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला. अश्लील भाषेत संभाषण केले. या प्रकाराबद्दल पिडितेने नातलगांशी सांगितले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन नमूद आरोपीविरुद्ध तक्रार दिल्याने भा. दं. वि. ३५४, बाललैंगिक छळान्वये गुन्हा नोंदला आहे. तपास सपोनि कुकडे करीत आहेत.