विठ्ठल रुक्मिणीचरणी १६ लाखांचे दोन सुवर्णहार अर्पण
By काशिनाथ वाघमारे | Published: June 5, 2024 06:09 PM2024-06-05T18:09:43+5:302024-06-05T18:10:18+5:30
भक्तांकडून देणग्याही येत आहेत.
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : कुंजीरवाडी, (ता. हवेली) येथील भाविक बबन रामचंद्र तुपे यांनी विठ्ठलास चार पदरी व रुक्मिणी मातेस पाच पदरी असे दोन सोन्याचे हार अर्पण केले आहेत. या हारांचे एकूण वजन २४९ ग्रॅम असून त्याची किंमत १५ लाख ९१ हजार ११० इतकी आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुरातत्व विभागाकडून जतन व संवर्धनाचे काम सुरु झाल्यापासून बदललेले रुपडे पाहण्यासाठी गर्दी वाढत असून भक्तांकडून देणग्याही येत आहेत.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने तुपे यांचा सत्कार मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते विठ्ठलाची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.