सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात जिल्हा उपनिबंधकासह अनेकांच्या दांड्या, वारंवार नोटिसा देऊनही अधिकाºयांना काहीही फरक पडेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:43 PM2018-02-06T14:43:56+5:302018-02-06T14:45:03+5:30
जिल्ह्यातील विविध विभागांकडील तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनाला अनेक खात्याच्या विभागप्रमुखांनी दांडी मारली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : जिल्ह्यातील विविध विभागांकडील तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनाला अनेक खात्याच्या विभागप्रमुखांनी दांडी मारली. पंचायतराज समितीच्या दौºयामुळे जिल्हा परिषदेकडील अधिकारी बैठकांमध्ये व्यस्त होते तर इतर विभागांकडेही कारणे तयार होती. या अधिकाºयांना याबाबत नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत तीन प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यात बेगमपूर येथील बाबुराव सतपाल यांनी विद्युत खांब आणि रोहित्र बसविल्याचे भाडे मिळण्याबाबत, रघुराज उपरे यांनी मुदत ठेवीची रक्कम मिळण्याबाबत अर्ज केला होता. पाथर्डी घोटी (ता. करमाळा) येथील चांगदेव वाघे यांनी शेतीच्या कामासाठी विद्युत कनेक्शन मिळण्याबाबत अर्ज केला होता. या तक्रारींचे निवारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़
जिल्हा पुनर्वसन कार्यालयाबद्दल सध्या अनेक तक्रारी आहेत. परंतु, या तक्रारींचे निवारण होत नाही. लोकशाही दिनातही पळसदेव (ता. इंदापूर) येथील रामदास काळे यांनी पर्यायी जमिनीचा ताबा मिळण्याबाबत तर हणुमंत भोसले (रा. सरकोली, ता. पंढरपूर) यांनी उताºयावर पेन्सिलने लिहिलेले शेरे कमी करण्याबाबत अर्ज दिला. यावर कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकाºयांनी दिले.
-----------------------
पोलिसांवर कारवाई करा
कुरुल, ता. मोहोळ येथील मारुती जाधव यांनी तीन तक्रारी केल्या. यात पेनूर येथील घरकूल घोटाळाप्रकरणी ग्रामसेवक आणि लाभार्थ्यांवर कारवाई करावी. मोहोळच्या पोलीस निरीक्षकांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, कुरुल पंचायत समिती सदस्यांवर ग्रामपंचायत कर न भरल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली. कोरवली, ता. मोहोळ येथील महादेव म्हमाणे यांनी ग्रामसेवकाच्या कारभाराची चौकशी करावी आणि घरकूल विक्रीबाबत ग्रामसेवकाने केलेल्या आदेश भंगप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
-------------------------
यांना बजावणार नोटिसा
जातपडताळणी कार्यालय, सहायक धर्मादाय आयुक्त, उपवनसंरक्षक, कार्यकारी अभियंता लाभक्षेत्र प्राधिकरण, कार्यकारी अभियंता उजनी कालवा क्र. ८, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण, अधिष्ठाता वैद्यकीय रुग्णालय यांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत.