अधिकारी, कर्मचारी करणार प्रत्येकी १० वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:20+5:302021-06-16T04:30:20+5:30

सांगोला तालुका अवर्षण प्रवणक्षेत्र असून सतत दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड देत आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यात वृक्षलागवड करणे अतिशय महत्त्वाचे ...

Officers, staff will plant 10 trees each | अधिकारी, कर्मचारी करणार प्रत्येकी १० वृक्षारोपण

अधिकारी, कर्मचारी करणार प्रत्येकी १० वृक्षारोपण

Next

सांगोला तालुका अवर्षण प्रवणक्षेत्र असून सतत दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड देत आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यात वृक्षलागवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे. वृक्षारोपण करून त्याचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य व सामाजिक जबाबदारी आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने १० वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. याबाबतची जनजागृती करावी, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १० वृक्षारोपण करून ७ दिवसांच्या आत तसा अहवाल तहसील कार्यालयाकडे फोटोसह सादर करावा, असे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले.

कोट :::::::::::::::::

येत्या दोन दिवसांत सांगोला वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडून प्रत्येकी ५०० प्रमाणे १ हजार वृक्ष कोतवाल, पोलीस पाटील यांना वाटप केले जातील. त्यानुसार ते परिसरात वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनासाठी मदत करणार आहेत.

- अभिजित पाटील

तहसीलदार, सांगोला

Web Title: Officers, staff will plant 10 trees each

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.