विठ्ठलाची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार; जाणून घ्या पंढरपुरातील त्यांचा दोन दिवसाचा दौरा

By Appasaheb.patil | Published: July 16, 2024 02:35 PM2024-07-16T14:35:27+5:302024-07-16T14:35:54+5:30

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित राहणार आहेत. 

Official Puja of Vitthala will be held by Chief Minister Know his two day tour in Pandharpur | विठ्ठलाची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार; जाणून घ्या पंढरपुरातील त्यांचा दोन दिवसाचा दौरा

विठ्ठलाची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार; जाणून घ्या पंढरपुरातील त्यांचा दोन दिवसाचा दौरा

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १६ व १७ जुलै २०२४ रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर  दौऱ्यावर येत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिरात होत असलेल्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री आज सहपरिवार पंढरपुरात दाखल होणार आहेत. दरम्यान, दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित राहणार आहेत. 

मंगळवार १६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता  कृषी पंढरी २०२४ प्रदर्शनाचे उद्घाटन स्थळ -कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, पंढरपूर.  सायं ४.१५  वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह पंढरपूर कडे प्रयाण. ४.३० वा. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप सोहळा, शासकीय विश्रामगृह. सायं. ५ वा.  विविध विशिष्ट मंडळे लोकप्रतिनिधी यांच्या भेटीसाठी राखीव स्थळ- शासकीय विश्रामगृह, पंढरपूर. सायं.६ वाजता शास्त्रीय विश्रामगृह येथे राखीव.

बुधवार १७ जुलै रोजी मध्यरात्री २.२० वा. शासकीय विश्रामगृह  येथून मोटारीने श्री विठ्ठल रखुमाई मंदिराकडे प्रयाण व आषाढी यात्रा २०२४ श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा. पहाटे ४.३० वा.  देव वृक्ष सुवर्णपिंपळ बीज प्रसादाचे प्रतिनिधीक स्वरूपात वारकऱ्यांना वाटप अजान रुक्ष लोकार्पण व माहितीपत्रकाचे विमोचन कार्यक्रम. पहाटे ४. ४५ वा. मोटारीने शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण.  पहाटे ५ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव . सकाळी ९ वाजता सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी भेटीगाठीसाठी राखीव. सकाळी ९.३० वा. मोटारीने चंद्रभागा बस स्थानकाकडे प्रयाण सकाळी १० वा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रभागा बस स्थानक व यात्री निवास इमारत लोकार्पण सोहळा या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ चंद्रभागा बस स्थानक. सकाळी १०.३० वा. तुळशी वृंदावन लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती. सकाळी  १०.४५  वा. राजश्री छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन भूमिपूजन कार्यक्रम उपस्थिती. स्थळ -श्री संत गजानन महाराज संस्थान, स. ११ वा.  महाराष्ट्र सुवर्ण जयंती  नगरोत्थान अभियान राज्यस्तर अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन. स्थळ- लिंक रोड कर्मयोगी शाळेकडे जाणारा मार्ग. स. ११.१५ वा. स्वच्छ वारी निर्मल वारी कार्यक्रमाचे समारोप स्थळ पंचायत समिती पंढरपूर त्यानंतर सकाळी ११.३० वा. शासकीय वाहनाने बारामतीकडे प्रयाण करणार आहेत.

Web Title: Official Puja of Vitthala will be held by Chief Minister Know his two day tour in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.