मंदिर पाहणीच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी केली दर्शन वारी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:15 AM2021-07-19T04:15:54+5:302021-07-19T04:15:54+5:30
आषाढी सोहळा प्रमुख असतो. या सोहळ्यानिमित्त सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागतात. पंढरपुरात पोलीस, महसूल, नगर परिषद, बांधकाम, आरोग्य विभाग ...
आषाढी सोहळा प्रमुख असतो. या सोहळ्यानिमित्त सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागतात. पंढरपुरात पोलीस, महसूल, नगर परिषद, बांधकाम, आरोग्य विभाग सर्वच जबाबदारीने काम करतात. शहरात रस्ता दुरुस्ती करण्यापासून ते नागरिकांच्या सुरक्षेचे काम या यंत्रणांना करावे लागते. यामुळे पालखी तळ विठ्ठल मंदिराची पाहणी करणे हा कामाचा भाग असतो.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून नये, यासाठी १८ मार्च २०२० पासून भाविकांना दर्शनासाठी श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर बंद करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आषाढी यात्रा देखील प्राथमिक स्वरूपात साजरी करण्यात येत आहे. यामुळे भाविकांना पंढरीत येण्यापासून रोखण्यात येत आहे. आषाढी यात्रेच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यामुळे मंदिरात महापूजेसाठी करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची पाहणी अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे; परंतु पाहणीच्या नावाखाली अनेक अधिकारी मंदिरात जाऊन, सोळखांबीपासून श्री विठ्ठलाचे दर्शन घेत आहेत. यामुळे राज्यातील लाखो भाविकांना दर्शन बंद मात्र, अधिकाऱ्यांना सुरू असल्याचा प्रत्यय येत आहे.