मुख्यमंत्री सचिवालयाचे अधिकारी पंढरपुरात; काय आहे नेमकं कारण जाणून घ्या

By Appasaheb.patil | Published: August 25, 2023 08:16 PM2023-08-25T20:16:42+5:302023-08-25T20:16:52+5:30

शासन आपल्या दारी उपक्रमामध्ये जनतेला स्थानिक स्तरावरच एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करुन देण्यात येत आहे

Officials of the Chief Minister's Secretariat in Pandharpur; Find out the real reason | मुख्यमंत्री सचिवालयाचे अधिकारी पंढरपुरात; काय आहे नेमकं कारण जाणून घ्या

मुख्यमंत्री सचिवालयाचे अधिकारी पंढरपुरात; काय आहे नेमकं कारण जाणून घ्या

googlenewsNext

पंढरपूर : विविध शासकीय योजनांचा जनतेला थेट लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. शासन आपल्या दारी अभियानातर्गंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित १० सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे  जिल्हास्तरीय कार्यक्रम नियोजित असून पंढरपूर येथील वाखरी हद्दीतील वाखरी-कोर्टी बाह्यवळणरस्ता येथील जागेची पाहणी प्रशासनाकडून करण्यात आली. या तयारीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयाचे अधिकारी शुक्रवारी पंढरपुरात आले होते. 

शासन आपल्या दारी उपक्रमामध्ये जनतेला स्थानिक स्तरावरच एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी किमान ३० ते ३५ हजार लाभार्थी येणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान शासकीय योजनांची माहिती देणारे ५० स्टॉल लावण्यात येणार आहेत.  सध्या पावसाचे दिवस असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कार्यस्थळी वॉटरप्रुफ मंडप उभारणी, आसन व्यवस्था, वाहनतळ, आरोग्य सुविधा, लाभार्थ्यांना लाभाचे मान्यवरांच्या हस्ते वाटपाचे काटेकोर नियोजन, वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी याबाबत नियोजन, विद्युत व्यवस्था आदीबाबतची पाहणी प्रशासनाकडून करण्यात आली.

Web Title: Officials of the Chief Minister's Secretariat in Pandharpur; Find out the real reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.