अधिकाऱ्यांना अजूनही वाटत नाही सत्तांतर झालाय; आत्ता जनतेची कामे न झाल्यास ऑपरेशन करू

By Appasaheb.patil | Published: September 5, 2022 05:03 PM2022-09-05T17:03:11+5:302022-09-05T17:03:23+5:30

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना भरला दम

Officials still don't think there has been a coup; If the work of the public is not done now, we will do an operation | अधिकाऱ्यांना अजूनही वाटत नाही सत्तांतर झालाय; आत्ता जनतेची कामे न झाल्यास ऑपरेशन करू

अधिकाऱ्यांना अजूनही वाटत नाही सत्तांतर झालाय; आत्ता जनतेची कामे न झाल्यास ऑपरेशन करू

googlenewsNext

सोलापूर : रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद आरोग्य विभागाचे आहे. रुग्णालयामध्ये स्वच्छतेला महत्त्व द्या. कागदपत्रात न अडकता रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी आज नातेपुते (ता. माळशिरस) येथे केले. अधिकाऱ्यांना अजूनही वाटत नाही सत्तांतर झालाय; आत्ता जनतेची कामे न झाल्यास ऑपरेशन करू असा दम तानाजी सावंत यांनी भरला.

आरोग्यमंत्री सावंत यांनी नातेपुते आणि माळशिरस येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार राम सातपुते, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, आता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव मोरे, नातेपुते ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नम्रता व्होरा, माळशिरसचे वैद्यकीय अधीक्षक मझहर काझी  आदीसह अधिकारी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. प्रा. सावंत यांनी ओपिडी रजिस्टर, औषध साठा, रुग्णांचा प्रकार याची प्रत्यक्ष माहिती घेऊन सूचना केल्या. औषधावरील तारीख स्वतः त्यांनी तपासून पाहून मुदतबाह्य औषधे न ठेवण्याच्या सूचना केल्या.

रुग्णालय स्वच्छतेसाठी दोन कर्मचारी नेमा
प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता ठेवावी. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक पातळीवर निविदा काढून दोन व्यक्ती स्वच्छतेसाठी नेमण्याचे निर्देश श्री सावंत यांनी दिले. त्या कर्मचाऱ्यांना दीडशे रुपयाऐवजी वाढवून पैसे द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना अग्निशमनचे प्रशिक्षण द्यावे
रुग्णालयात आगीचे प्रकार घडत आहेत, ग्रामीण रुग्णालयानी फायर ऑडिट करून घ्यावे. तज्ज्ञमार्फत  अग्निशमनविषयी प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

रुग्णालयात ठिकठिकाणी फलक लावावेत
रुग्णालयात ग्रामीण भागातून रुग्ण येत असतात. रुग्णांना कुठे काय आहे, याची माहिती समजण्यासाठी त्यांना समजेल अशा भाषेत ठिकठिकाणी कायमस्वरूपी सूचना फलक लावावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

ॲडमिट रुग्णांजवळ रोगनिदान कागद ठेवावा
रुग्णालयात रुग्ण डमिट होतो. ऍडमिट झालेल्या ठिकाणी रुग्णाला काय आजार आहे, उपचार काय सुरु आहेत. याबाबत त्याच्या कॉटजवळ रोगनिदान कागद ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

रुग्णांची केली विचारपूस
नातेपुते आणि माळशिरस दोन्ही ठिकाणी श्री सावंत यांनी पुरुष आणि स्त्री रुग्ण कक्षाला भेट देवून रुग्णांची विचारपूस केली. काय मावशी...काय बाबा... आता बरं आहे का... कधी ऍडमिट झाला.... कोणी तपासलं... औषधे घेतली का... अशी चौकशी त्यांनी केली. यावर रुग्णांनी समाधानकारक उत्तर दिले.

कोविड लसीकरणावर भर द्या..
कोविडचा प्रादुर्भाव कमी वाटत असला अजून कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. यामुळे कोरोना लसीकरण करून घ्यावे. काही नागरिकांनी पहिला डोस घेतला, मात्र दुसरा डोस अद्याप घेतलेला नाही. अशा नागरिकांचे समुपदेशन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

 

Web Title: Officials still don't think there has been a coup; If the work of the public is not done now, we will do an operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.