बोरामणीच्या बापू कुटीत अधिका-यांना ग्रामीण विकासाचे धडे मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:26 AM2021-08-14T04:26:40+5:302021-08-14T04:26:40+5:30

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील महात्मा गांधी ग्लोबल व्हिलेज येथे पंचायत राज व भूजल सर्वेक्षणावर यशदाचे संचालक ...

Officials will learn rural development at Boramani's Bapu Kuti | बोरामणीच्या बापू कुटीत अधिका-यांना ग्रामीण विकासाचे धडे मिळणार

बोरामणीच्या बापू कुटीत अधिका-यांना ग्रामीण विकासाचे धडे मिळणार

Next

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील महात्मा गांधी ग्लोबल व्हिलेज येथे पंचायत राज व भूजल सर्वेक्षणावर यशदाचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. आता बोरामणीच्या बापू कुटीत सरकारी अधिका-यांना ग्रामीण विकासाचे धडे गिरवण्याची संधी मिळणार असल्याचे डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी होते. याप्रसंगी विभागीय उपअभियंता राजेश जगताप, पंचायत राज प्रशिक्षण केंद्र गौडगावचे प्राचार्य रमाकांत गरड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. कलशेट्टी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. उपाध्यक्ष प्रा. अनिकेत चनशेट्टी यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. तर प्रास्ताविक अधीक्षक मल्लिनाथ यांनी केले. या कार्यशाळेत प्राचार्य विनील जांभळे, प्राचार्या आसमा नदाफ, राजेंद्र कदम, जोतिबा गिड्डे, आप्पासाहेब गुगले, सोमनाथ बनसोडे, रंजना दुपारगुडे, इंदुमती सुतार, माया व्हरटे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Officials will learn rural development at Boramani's Bapu Kuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.