Maharashtra Election 2019; अरे, काय म्हणतीय हवा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 11:05 AM2019-10-12T11:05:31+5:302019-10-12T11:58:08+5:30

विधानसभा निवडणुकीतील राजकीय गप्पा...

Oh, what should I say? | Maharashtra Election 2019; अरे, काय म्हणतीय हवा ?

Maharashtra Election 2019; अरे, काय म्हणतीय हवा ?

Next

राजकुमार सारोळे

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आता चांगलाच रंग भरू लागलाय. जिकडं तिकडं निवडणुकीचीच चर्चा. नवरात्रोत्सव कसा संपला ते कळलंच नाही. एक तर पावसाचा कहर दुसरीकडे निवडणुकीचा फॉर्म भरण्याची धांदल. झालं एकदाचं कोण कुठं हे ठरलं. आता प्रचाराचा धुरळा सुरू झाला आहे. उमेदवाराची कार्यकर्ते जमविण्याची धांदल सुरू. कार्यकर्तेही तितकेच बेरके, सकाळी एका, दुपारी दुसºया आणि संध्याकाळी तिसºया संपर्क कार्यालयात हजेरी लागू लागली आहे. निवडणुकीमुळे सरकारी कार्यालये मात्र ओस पडलेली. त्यात महापालिका कशी अपवाद असेल. एरव्ही सभागृह, इंद्रभुवन आणि प्रशासकीय इमारत गर्दीने फुललेली असते.

आता मात्र नगरसेवक, पदाधिकारी फिरकत नसल्याने दुपारी महापालिकेत संचारबंदी आहे की काय असे वाटू लागले आहे. महापालिकेत सकाळ, दुपार आणि सायंकाळ असे तीन प्रकारचे वातावरण असते. निवडणुकीमुळे  इंद्रभुवनातील सायंकाळचा राजकीय कट्टा ओस पडल्याचे चित्र दिसत आहे. अन्यथा एरव्ही महापालिकेचे राजकारण याच कट्ट्यावरून चालते. उत्सुकतेपोटी शुक्रवारी सायंकाळी इंद्रभुवनच्या कट्ट्यावर फेरफटका मारला. सायंकाळी फिरत आलेले चार-पाच कार्यकर्ते कट्ट्यावर जमलेले, त्यांच्यातील संवाद ऐकल्यावर शहरातील राजकारण तापल्याची जाणीव झाली. अरे काय म्हणतीय तुमच्याकडे हवा, पहिला म्हणाला. दुसरा लगेच, काय सांगू आमच्या हिकडं अजून काही बी ठरंना बघ, तिकडं पूर्वभागात म्हनं लई वातावरण तापलेलं हाय. अरे मतदानासाठीबी दोन मशीन लावणार हैतं मनं. कुणाचं बटन कुटं हाय हे कसं सापडणार बग. अरे तसं नसतंय ते, पहिला म्हणाला. उमेदवारच घरोघरी आल्यावर सांगतीत की, तेंचा नंबर कुटं हाय ती. चिन्हावरूनबी सापडल की, त्यात काय अवघड हाय त्ये.  दुसºयाची पुन्हा शंका, तुला म्हणाय काय जातेय ते. आपल्या बायकांना सुद्राला पाईजील की. मशीनजवळ किती येळ थांबू देतात म्हैत हाय का.म्हागच्या येळंला असाच घोळ झाला व्हता. लई जण अशा गोंधळात असत्यात. झोपडपट्टीतील लोकांना हे समजण्यासाठी अगुदर माहिती करून द्यायला पायजेल बग. तिकडं सांगुल्यात अन पंढरीत बी अशीच दोन मशिनी लावणार हायती.

शहरात काय वांदा नाही, पन शिकलेल्या नसलेल्या माणसांना या मशीनचं गणित कळत नाही बग. पहिला: अरे शान्या, तिथं मतदान अधिकारी असत्यात. ते मशीनवरील मतपत्रिकेबाबत मायती देत्यात. आपले पोलिंग एजंटबी असत्यातच की. तुझं म्हननं सांग, कुण यील निवडून. दुसºयाचे उत्तर: हे बग कुण निवडून यील हे आत्ताच कसं सांगता यील. पैले आपला उमीदवार ठरू दी. आपली कामं कोण करणार. शहराचं ईकासाचा प्रश्न हाय इथं. सगळीजणंच मीच ईकास करणार असं सांगतीती. पण आपल्या कामाचा कोण हाय ही तर आधी समजू दी. ए तेला बोलव, तो तिकडच्या झोनला डिवटीला हाय बग तेला मैत अशील सगळं.

कायं रे तुमच्याकडं काय हवा हाय. तिसरा यांच्याकडे येत, अरे भौ, काय हवा बिवा न्हाय बग. अजून सगळा गोंधळच चालला आहे. जो तो येतु अन मीच ईकास करणार हाय असा सांगतुया. आरं इथं ईकासाचं कुनाला पडलंय. हाताला काम न्हाई. कितीजण तर असंच फिरत्यात. आमी रोजंदारी म्हणून कसंतरी भागतयं. तिकडं परीवनचा संप चाललाय कुणी ईचारीना, जलात्येला कामाचं पडलंय बग. आता दिवाळीचा बोनस बी मिळतंय की न्हायी बग. त्यामुळं राजकारणाची हवा ही हवाच असतीय बग. जिकडं वारं वाहिल तिकडं आपून जायचं. उगीच कुणाचा वाईटपणा घ्याचा न्हाय, आपल्याला जे समजतंय तसं करायचं बग...चला निघू. 

Web Title: Oh, what should I say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.