शेतजमीन विकून सावकाराने फसविले वृद्धेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:19 AM2020-12-23T04:19:23+5:302020-12-23T04:19:23+5:30

सांगोला : एका वृद्ध महिलेने खासगी सावकाराला १ हेक्टर शेतजमीन खरेदी देऊन व्याजाने घेतलेल्या ३ लाख ५० हजारापोटी मुद्दल ...

Old man cheated by moneylender by selling agricultural land | शेतजमीन विकून सावकाराने फसविले वृद्धेला

शेतजमीन विकून सावकाराने फसविले वृद्धेला

Next

सांगोला : एका वृद्ध महिलेने खासगी सावकाराला १ हेक्टर शेतजमीन खरेदी देऊन व्याजाने घेतलेल्या ३ लाख ५० हजारापोटी मुद्दल व व्याजासह १८ लाख रुपये परत देऊनही आणखी ५ लाखाची मागणी करून तगादा लावला. जबरदस्तीने शेतजमीन खरेदी करून त्यापैकी दीड एकर जमीन परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी सांगोला पोलिसांनी नानासाहेब धोंडिबा आलदर (रा.कोळा, ता. सांगोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शालन किसन आलदर (वय ६५, रा. गौडवाडी) यांनी खासगी सावकार नानासाहेब धोंडीबा आलदर विरुद्ध फिर्याद दिली आहे.

या वृद्धेने २०१४ मध्ये घरगुती अडचणींमुळे कोळे येथील नानासाहेब धोंडीबा आलदर याच्याकडून वडिलोपार्जित ३ लाख ५६ हजार रुपये तीन टक्के व्याज दराने घेतले होते. त्याबदल्यात नानासाहेब याने शालन यांच्या पतीची वडिलोपार्जित एक हेक्‍टर जमीन जबरदस्तीने खरेदी करून घेतली. व्याजाने घेतलेल्या पैशाच्या मोबदल्यात शालन आलदर यांनी व्याज व मुद्दल मिळून १८ लाख रुपये दिले. दरम्यान, नानासाहेब आलदर याने शालन आलदर यांच्या जमिनीतील ८१ आर इतकी जमीन त्यांचा मित्र यशवंत बाबा माळी (रा.गौडवाडी) यांच्या नावावर केल्याचे समजले. शालन आलदर यांनी नानासाहेबास सगळे पैसे दिले आहेत. जमीन परत द्या, अशी मागणी केली असता, त्यांना ती जमीन आलदर यांना एक हेक्टर ११ आर इतकी परत केली. राहिलेली ६० आर जमीन परत मागितली असता, नानासाहेब आलदर यांनी अजून व्याजाचे ५ लाख रुपये द्या, अशी मागणी केली. त्यानंतर फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Old man cheated by moneylender by selling agricultural land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.