वृद्धेच्या गळ्याला चाकू लावून दागिने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:24 AM2021-09-18T04:24:30+5:302021-09-18T04:24:30+5:30

वैराग : बार्शी तालुक्यात आळजापूर येथे वृद्धेच्या गळ्याला धारदार चाकू लावून अंगावरील दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली. या घटनेने ...

The old man was stabbed in the neck and robbed of jewelery | वृद्धेच्या गळ्याला चाकू लावून दागिने लुटले

वृद्धेच्या गळ्याला चाकू लावून दागिने लुटले

Next

वैराग : बार्शी तालुक्यात आळजापूर येथे वृद्धेच्या गळ्याला धारदार चाकू लावून अंगावरील दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली. या घटनेने आळजापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वैराग पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जीबिदा याशीन चौगुले (रा. ६५, रा. आळजापूर, ता. बार्शी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार चौगुले कुटुंबीय जेवण आटोपून चौगुले कुटुंब हे शेतातील वस्तीवर गुरुवारी रात्री झोपी गेले. पहाटे एक वाजेच्या दरम्यान बाहेरून घराची कडी वाजल्याचा आवाज आला. त्यामुळे चौगुले दांपत्य जागे झाले अन् बाहेर आले. इतक्यात दोघेजण समोर आले. पैकी एकाने अचानक गळ्याला धारदार चाकू लावून सोन्याचे गंठण, कर्णफुले, बोरमाळ हिसकावून घेतले. दुस-याने घराची झाडाझडती घेतली.

या चोरीच्या घटनेत २५ वर्षापूर्वीचे ३५ हजारांचे दागिने चोरट्यांनी बळजबरीने ओढेन नेले.

Web Title: The old man was stabbed in the neck and robbed of jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.