भीमानदीवरील जुना दगडी पुल पाण्याखाली; पंढरपुरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 01:11 PM2020-09-19T13:11:19+5:302020-09-19T13:13:22+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
पंढरपूर : उजनी धरण परिसरात व व भीमा नदीच्या क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकार यांनी दिली.
पंढरपुरातील भीमा नदीपात्रामध्ये ६० हजार क्युसेक च्या आसपास पाणी आहे. यामुळे नदीपात्र वरील जुना दगडी पुल पाण्यामध्ये बुडाला आहे. पूर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.