‘...बाप से बात कर’वर ते म्हणाले, मी घाबरत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 06:22 AM2023-09-10T06:22:11+5:302023-09-10T06:22:37+5:30
‘जवान’च्या डॉयलॉगवर वानखेडेंचे बोल
लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर : ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खानचा एक डायलॉग आहे. त्यात तो म्हणतो, “बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर.” हाच डायलॉग तुफान व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांकडून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे हे ट्रोल होत आहेत, यावरून त्यांना विचारले असता मी कुणाला घाबरत नाही. विठ्ठलाचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे असे वानखेडे पंढरपुरात म्हणाले.
विठ्ठलाचा आशीर्वाद
nड्रग्जप्रकरणी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केली होती. यामुळे डायलॉगद्वारे शाहरुखने समीर वानखेडे यांना टोला लगावल्याचं म्हटलं जात आहे.
nपुढे ते म्हणाले, मी केस संदर्भात सांगू शकत नाही. आपली न्यायप्रणाली भक्कम व चांगली आहे, माझा न्यायप्रणालीवर पूर्ण विश्वास आहे. माझ्यावर विठ्ठलाचा आशीर्वाद असून, तो असाच राहणारच आहे.