सोलापुरात भाजपचे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन

By Appasaheb.patil | Published: March 20, 2023 07:18 PM2023-03-20T19:18:34+5:302023-03-20T19:19:06+5:30

 भारतीय युवा मोर्चाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला.

 On behalf of the Bharatiya Yuva Morcha, the Nationalist Congress Party's symbolic photo of Jitendra Awhad, the party's MLA, was protested |  सोलापुरात भाजपचे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन

 सोलापुरात भाजपचे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन

googlenewsNext

सोलापूर : भारतीय युवा मोर्चाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला. हिंदू धर्म हा देशाला लागलेली कीड आहे असे वक्तव्य जिंतेंद्र आव्हाड ने केले होते  त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

टिळक चौक येथे लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भारत माता की जय, सनातन हिंदू धर्म की जय, जीतूद्दीन आव्हाड मुर्दाबाद अशा पद्धतीच्या घोषणा देऊन फोटोला चपला मारण्यात आल्या. यावेळी बोलताना किरण देशमुख म्हणाले की,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आव्हाड हे वारंवार हिंदू धर्मावर टीका करत आहे. स्वतः मुस्लिम बहुबाल भागातून निवडून येऊन हिंदू धर्माला नाव ठेवण्याचं काम हे आव्हाड करत आहे. या आधी देखील छत्रपती शिवरायांपेक्षा अफझलखान किती बलवान होता हे दाखवण्यासाठी आव्हाड ने जीवच रान केलं, प्रत्येकाला आपला धर्म हा मातृसमान आहे आणि हा आव्हाड आमच्या मातृत्वाला बोलत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही. 

आव्हाड हा हिंदू धर्मात जन्मलेला कलंक आहे. अशा पद्धतीचे परखड मत सिद्धार्थ मंजेली व प्रेम भोगडे यावेळी व्यक्त केले. यावेळी अनिल कंदलगे, सतीश महाले, प्रशांत फत्तेपूरकर, शिवा कावडे, राहुल घोडके, प्रवीण गलांडे,  शेखर येगे, वैभव बिराजदार, संदीप दुगाले, प्रतीक आडम यांच्यासह भाजप, युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते आधी उपस्थित होते.


 

Web Title:  On behalf of the Bharatiya Yuva Morcha, the Nationalist Congress Party's symbolic photo of Jitendra Awhad, the party's MLA, was protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.