आषाढी यात्रेसाठी ७ जुलैपासून १८ दिवस घेता येणार विठ्ठलाचे २४ तास दर्शन; मंदिर प्रशासनाचा निर्णय 

By काशिनाथ वाघमारे | Published: May 18, 2024 04:55 PM2024-05-18T16:55:40+5:302024-05-18T16:56:54+5:30

आषाढी यात्रेसाठी दोन हजार कर्मचारी, स्वयंसेवकांची नियुक्ती.

on the occassion of aashadhi ekadashi vitthal rukmini temple open for 24 hours decision of temple administration | आषाढी यात्रेसाठी ७ जुलैपासून १८ दिवस घेता येणार विठ्ठलाचे २४ तास दर्शन; मंदिर प्रशासनाचा निर्णय 

आषाढी यात्रेसाठी ७ जुलैपासून १८ दिवस घेता येणार विठ्ठलाचे २४ तास दर्शन; मंदिर प्रशासनाचा निर्णय 

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : १७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी सोहळा होत आहे. यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या यात्रेला भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन ७ ते २४ जुलै दरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

यावेळी शेळके म्हणाले, येणाऱ्या भाविकांना सुलभ व तत्काळ दर्शन व्हावे, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. दर्शन रांग, पत्रा शेड, दर्शन मंडप येथे भाविकांना अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी २ हजार कर्मचारी, स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे.

यावेळी दर्शनरांग व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, यात्रेतील प्रथा व परंपरा, सुरक्षा व्यवस्था, दर्शन रांगेतील अन्नदान, वैद्यकीय व्यवस्थेचे स्टॉल, स्वच्छता व्यवस्था, शासकीय महापूजा, लाइव्ह दर्शन व्यवस्था, देणगी व्यवस्था, निवास व्यवस्था, अपघात विमा पॉलिसी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही व वायरलेस यंत्रणा, लाडू प्रसाद व्यवस्था, महिलांसाठी चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष व विश्रांती कक्ष आदी व्यवस्थेचा आढावा घेऊन आषाढी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनास केल्याची माहिती त्यांनी दिली. 

Web Title: on the occassion of aashadhi ekadashi vitthal rukmini temple open for 24 hours decision of temple administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.