ठरलं एकदाचं; प्रत्येक विद्युतपंपाला तीन हजार भरायचं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:21 AM2021-03-18T04:21:19+5:302021-03-18T04:21:19+5:30
त्यावर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी वीज मंडळाचे मुख्य अभियंता बावडे, अधीक्षक अभियंता पडळकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अकलूजचे कार्यकारी अभियंता ...
त्यावर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी वीज मंडळाचे मुख्य अभियंता बावडे, अधीक्षक अभियंता पडळकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अकलूजचे कार्यकारी अभियंता अनिल वडर, उपकार्यकारी अभियंता महेश निकम, वसुली अधिकारी प्रदीप सुरवसे यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांबरोबर एक संयुक्त बैठक घेतली. यावेळी प्रतिएचपी ३ हजार रुपये वीज बिल भरावे, असे वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
परंतु अतिवृष्टी, कोरोना काळात शेतीमाल कवडीमोलाने विकला गेला आहे. शेतकऱ्यांकडे एवढ्या प्रमाणात वीज बिल भरण्याची आर्थिक क्षमता राहिली नसल्याचे शेतकऱ्यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांना सांगितले. त्यावेळी प्रति विद्युतपंपामागे ३ हजार रुपये वीज बिल भरून घेऊन वीज पुरवठा अखंडित ठेवला जावा, असा तोडगा विजयसिंह मोहिते-पाटील यांनी काढला. तो शेतकरी आणि अधिकाऱ्यांनीही मान्य केला. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज बिल वसुलीच्या तगाद्यातून दिलासा मिळाला आहे. यावेळी सहकार महर्षी कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रकाश पाटील, दत्तात्रय भिलारे, सूर्यकांत शेंडगे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
कोट ::::::::::::::::::::::::
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या महामारीत शेती मालाला कवडीमोल मिळाले. त्यामुळे शेतकरी सध्या खूप अडचणीत आहे. वीज मंडळाची सक्तीने होणारी वीज बिल वसुली थांबवण्याची सर्वत्र मागणी होत आहे. त्यात तालुक्यात वीज तोडणे सुरूच आहे. त्यावर निघालेला तोडगा शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा देणारा राहील.
- विजयसिंह मोहिते-पाटील
माजी उपमुख्यमंत्री