Credit Card च्या बहाण्याने महिलेच्या खात्यातून काढले दीड लाख; ११ महिन्यांनी गुन्हा दाखल
By रूपेश हेळवे | Updated: May 27, 2023 14:32 IST2023-05-27T14:32:33+5:302023-05-27T14:32:46+5:30
याप्रकरणी प्रभा कदम यांनी तब्बल अकरा महिन्यांनी फिर्याद दिली आहे. विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Credit Card च्या बहाण्याने महिलेच्या खात्यातून काढले दीड लाख; ११ महिन्यांनी गुन्हा दाखल
सोलापूर : क्रेडिट कार्ड सुरू करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने महिलेच्या खात्यातून दीड लाख रूपये काढून घेत महिलेला फसवले. याप्रकरणी ही घटना १ जून २०२२ रोजी घडली होती. याप्रकरणी प्रभा ज्ञानेश्वर कदम ( वय ४५, रा. विजापूर नाका) यांनी शुक्रवार २६ मे रोजी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून एका मोबाईल धारकावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी कदम यांना आपले क्रेडिट कार्ड सुरू करायचे होते. याच दरम्यान त्यांना एका अज्ञात इसमाने फोन करून आपण बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर संबंधिताने त्यांच्या खात्यातील १ लाख ४२ हजार ५९४ रूपये काढून घेतले. ही घटना १ जून २०२२ मध्ये घडली. याप्रकरणी प्रभा कदम यांनी तब्बल अकरा महिन्यांनी फिर्याद दिली आहे. विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून एका मोबाईल धारकावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक हनपुडे पाटील करत आहेत.