नागणसुरात एकाच रात्रीत चार ठिकाणच्या चोरीत दुचाकीसह दीड लाखाचा ऐवज लंपास
By काशिनाथ वाघमारे | Published: March 28, 2024 04:47 PM2024-03-28T16:47:11+5:302024-03-28T16:47:30+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी पहाटेच्या वेळी नागणसूर येथे येऊन प्रथमत: बसवराज किणगी यांचे घर फोडले.
सोलापूर : नागणसूर (ता. अक्कलकोट) येथे एकाच रात्रीत चार घरे फोडून चोरट्यांनी मोटारसायकलसह दीड लाखांचा ऐवज पळवला आहे. ही घटना बुधवार, २७ मार्च रोजी रात्री ३ वाजता घडली आहे. याबाबत दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी पहाटेच्या वेळी नागणसूर येथे येऊन प्रथमत: बसवराज किणगी यांचे घर फोडले. कपाटामधील १५ ग्रॅम सोने, २६ हजार लंपास केले. सिद्धाराम कवडी यांची दुचाकी मोटारसायकल चोरून नेली. जगन्नाथ धानशेट्टी यांचे घर फोडून कपाटातील १५ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाले. सदर जगन्नाथ हे दवाखाना उपचारासाठी मुलांकडे विजापूरला गेले होते. घराला कुलूप असल्याचे पाहून चाेरट्यांनी संधी साधली. अशा चार ठिकाणी झालेल्या चोरीत चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज लंपास केला आहे.
चोरटे सीसीटीव्हीत कैद...
गंगाराम धानशेट्टी यांचे घर फोडून फोडल्यानंतर झोपी गेलेल्या लोकांना पाहत अंगणात आले. अंगणात झोपलेल्या ७५ वर्षीय चनम्मा धानशेट्टी या वृद्धेच्या डोक्याखाली ठेवलेली पान-सुपारीची पिशवी उचलली. त्यात पान, सुपारी, तंबाखू, ३० रुपये मिळून आले असता ती पिशवी जवळील गटारीत टाकून पळाले. हा सारा प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.