अनाधिकृत वीज वापराची सोलापूरात दीड हजार प्रकरणे उघडकीस

By Appasaheb.patil | Published: November 15, 2022 07:08 PM2022-11-15T19:08:10+5:302022-11-15T19:08:30+5:30

वीज चोरांनो सावधान, पन्नास हजार वीज जोडण्यांची तपासणी

One and a half thousand cases of unauthorized electricity consumption were revealed in Solapur | अनाधिकृत वीज वापराची सोलापूरात दीड हजार प्रकरणे उघडकीस

अनाधिकृत वीज वापराची सोलापूरात दीड हजार प्रकरणे उघडकीस

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : गेल्या सहा महिन्यांत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात वीज चोरीची ५७१९ प्रकरणे व अनधिकृत वीज वापराची १५९१ प्रकरणे उघडकीस आली आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत वीज चोरी विरुद्ध कडक मोहीम राबविण्यात आलेली असून ४७५६३ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यात १६ कोटी ७ लाख रुपयांची एकूण ५७१९ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली तर ६ कोटी ४३ लाख रुपयांची १५९१ अनधिकृत वीज वापराची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. प्राप्त माहितीनुसार वीज चोरीच्या २४६३ प्रकरणात ८ कोटी ९३ लाख रुपयांची वसुली करण्यात आलेली असून अनधिकृत वीज वापराच्या ५२४ प्रकरणात एक कोटी ९० लाख रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे.

पुणे परिमंडळात एकूण ११ हजार ६३६ वीज जोडण्या तपासल्या. यात अनधिकृत वीज वापराची ९५२ प्रकरणे व वीज चोरीची १५०२ प्रकरणे उघडकीस आली. बारामती परिमंडळात एकूण १२ हजार ६८९ वीज जोडण्या तपासल्या तेंव्हा यात अनधिकृत वीज वापराची २४३ प्रकरणे व वीजचोरीची ३०२९ प्रकरणे उघडकीस आली. तर कोल्हापूर परिमंडळात एकूण २३ हजार २३८ वीज जोडण्या तपासण्यात आल्या. यात अनधिकृत वीज वापराची ३९६ प्रकरणे व वीज चोरीची ११८८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. आता यापुढे वीज चोरीविरुद्ध मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्री अंकुश नाळे यांनी दिले असून वीज चोरी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ व १३६ नुसार वीज चोरी हा दंडनीय अपराध असून यात आरोपींना ३ वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज चोरीपासून परावृत्त व्हावे, असे महावितरणने आवाहन केले आहे.

Web Title: One and a half thousand cases of unauthorized electricity consumption were revealed in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.