अंगणवाडीच्या नवीन इमारत अन् दुरूस्तीसाठी दीडकोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:21 AM2021-03-24T04:21:00+5:302021-03-24T04:21:00+5:30
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने १ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर झाल्याचे माहिती आमदार सचिन ...
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने १ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर झाल्याचे माहिती आमदार सचिन कल्यांणशेट्टी यांनी दिली.
एकात्मिक विकास योजनेतून लहान मुले शिक्षण घेत आहेत पण अनेक गावातील इमारती या तात्पुरत्या स्वरुपात होत्या आणि त्याची अवस्था जीर्ण झालेली होती तर काही अंगणवाडी इमारत या नादुरुस्त अवस्थेत होत्या. पावसाळयात या इमारतींचा शाळा भरविण्यात त्रास होत होता. याचा विचार करून आ. कल्याणशेट्टी यांनी जिल्हा नियोजन समिती कडे शिफारस केली होती. ज्या जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंगणवाडी केंद्र नवीन इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली त्यांना प्रत्येकी ८.५ लाख रुपये इतका मंजूर झाला आहे. ज्यात समर्थ नगर, हत्तीकणबस,चप्पळगांव,बोरोटी स्टेशन, तोळणूर, काळेगांव, तडवळ, धारसंग, शिरवळवाडी, कडबगांव, कासेगांव, दर्गनहळ्ळी, उळे, बोरामणी, पिंजरवाडी, तिर्थ अशा १६ अंगणवाडीचा समावेश आहे. ज्यात चपळगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या मंगलाताई कल्याणशेट्टी यांच्या हन्नूर व पितापूर या दोन गावांच्या निधीचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंगणवाडी केंद्र स्वमालकीची इमारत बांधकाम दुरुस्तीस प्रशासकिय मान्यता मिळाली त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. ज्यात म्हेत्रे तांडा,अक्कलकोट स्टेशन, हिळ्ळी, हालचिंचोळी, करजगी, म्हैसलगी, केगांव, नाविंदगी, किणी, साफळे, खैराट व किरनळ्ळी या बारा गावांचा समावेश आहे. या प्राप्त निधीमुळे तात्काळ पावसाळ्यापूर्वी बांधकाम होऊन विद्यार्थ्यांना इमारतींची सोय होणार असल्याचे आमदार कल्यांणशेट्टी यांनी सांगितले.
----