ब्रिटिशकालीन दीड किमी बोगद्यातील गाळ काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:19 AM2020-12-08T04:19:28+5:302020-12-08T04:19:28+5:30

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सुलभरीत्या पाणी मिळावे यासाठी राजेवाडी-म्हसवड कालवा क्र. १ ते लक्ष्मीनगरपर्यंतच्या कालव्यातील झाडेझुडपे काढण्याचे नियोजन करण्यात आले ...

One and a half km of British era tunnel sludge will be removed | ब्रिटिशकालीन दीड किमी बोगद्यातील गाळ काढणार

ब्रिटिशकालीन दीड किमी बोगद्यातील गाळ काढणार

Next

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सुलभरीत्या पाणी मिळावे यासाठी राजेवाडी-म्हसवड कालवा क्र. १ ते लक्ष्मीनगरपर्यंतच्या कालव्यातील झाडेझुडपे काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे म्हसवड कालवा क्र. १ मध्ये अनेक ठिकाणी अस्तरीकरणाची दुरवस्था झाली आहे. राजेवाडी तलावापासून लक्ष्मीनगरपर्यंतच्या कालव्यात झाडेझुडपे, गवत वाढले आहे, तर ब्रिटिशकालीन दीड किमी राजेवाडी बोगद्यामध्ये गाळ साचल्याने पाण्याची वहनक्षमता कमी झाली होती.

या पाण्याची वहनक्षमता वाढविण्यासाठी व राजेवाडी तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्याना रब्बी हंगामाचे पाणी सुलभरीत्या मिळावे म्हणून कालव्याची आवश्यक ती दुरुस्तीची कामे करावीत, यासंदर्भात पाटबंधारे अधिकाऱ्यांना आ. शहाजीबापू पाटील यांनी सूचना केल्या होत्या.

यावेळी नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता संजय बोडखे, उपविभागीय अभियंता नागेंद्र ताटी, शाखा अभियंता अभिमन्यू जाधव, पंचायत समिती सदस्य दादासाहेब लवटे, रवींद्र कदम, सुरेश कदम, प्रमोद हुबाले यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

कोट :::::::::::::

कालवा दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांनी तातडीने सुमारे एक कोटी ५० लाख रुपये खर्चाचे आपत्कालीन अंदाजपत्रक तयार केले. कालवा व बोगद्यातील गाळ काढून पाण्याचा प्रवाह वेगाने वाहण्यासाठी स्वच्छतेची कामे तत्काळ पूर्ण करावीत.

- ॲड. शहाजीबापू पाटील, आमदार, सांगोला

फोटो ओळ :::::::::::::::::

राजेवाडी - म्हसवड कालवा क्र. १ ब्रिटिशकालीन बोगद्यातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करताना आ. शहाजीबापू पाटील, पाटबंधारे अधिकारी, लाभधारक शेतकरी.

Web Title: One and a half km of British era tunnel sludge will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.