कचऱ्यापासून दररोज दीड मेगावॅट वीज निर्मिती

By admin | Published: July 8, 2016 08:07 PM2016-07-08T20:07:48+5:302016-07-08T20:10:14+5:30

महापालिकेने बीओटीवर (बांधा वापरा हस्तांतरीत करा) राबविलेल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पातून दररोज दीड मेगॅवॅट वीज निर्मिती होत आहे. राज्यातील हा एकमेव पथदर्शी प्रकल्प आहे.

One and a half MW electricity generation every day from the waste | कचऱ्यापासून दररोज दीड मेगावॅट वीज निर्मिती

कचऱ्यापासून दररोज दीड मेगावॅट वीज निर्मिती

Next

राजकुमार सारोळे

सोलापूर : महापालिकेने बीओटीवर (बांधा वापरा हस्तांतरीत करा) राबविलेल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पातून दररोज दीड मेगॅवॅट वीज निर्मिती होत आहे. राज्यातील हा एकमेव पथदर्शी प्रकल्प आहे.
महापालिकेने २00८ मध्ये मुंबईतील आॅरगॅनिक्स रिसायकलिंग सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प राबविण्यास परवानी दिली. कंपनीचे कार्यकारी संचालक सुहास भांड यांच्या मार्गदर्शनाखाली २00९ मध्ये तुळजापूर रस्त्यावरील कचरा डेपोजवळ प्रकल्प उभारणीस सुरूवात केली. प्रकल्प अभियंता विक्रम देशमुख यांनी ९ एकर जागेवर ४५ कोटी खर्चुन ३ मेगॅवॅट वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली. गेल्या तीन वर्षापासून दररोज १ ते दीड वॅट वीज निर्मिती यशस्वीपणे सुरू झाली आहे.
सरव्यवस्थापक राम माथूर व तांत्रिक व्यवस्थापक राजीव यादव यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. ३ मेगॅवॅट वीज प्रकल्पासाठी दररोज ४00 टन ओला व सुका कचरा आवश्यक आहे. पण महापालकेच्या यंत्रणेकडून दररोज दीडशे दोनशे टन कचरा उपलब्ध केला जातो. पहिल्या टप्प्यात या कचऱ्यातून दगड, माती, कापड, प्लॉस्टिक पिशव्या बाहेर काढल्या जातात. दुसऱ्या टप्प्यातही ही विलगीकरण प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात कचरा बारिक करून चाळणीद्वारे दोन भाग केले जातात. त्यात एकदम बारीक झालेला कचरा गॅस टाकीत नेला जातो तर दुसरा भाग खत निर्मिती विभागात जमा केला जातो. कचऱ्यापासून मिथेन गॅसची निर्मिती करून यावर दोन इंजीन चालवून वीज निर्मिती केली जाते. कंपनीने पूर्वी तीन इंजीन बसविले आहेत. आता चौथे इंजिन आणण्यात आले आहे. शहरात सध्या कचरा संकलनाची समस्या आहे. कचरा वाढला की प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालेल अशी कंपनीची आशा आहे. सोलापुरात विडी उद्योग असल्याने तेंदूच्या पानाचा कचरा मोठ्या प्रमाणावर मिळतो. राज्यात इतर दोन ठिकाणी असे प्रयोग झाले पण यश्स्वी झालेले नाहीत.
*कंपोस्ट खताची निर्मिती***
कचऱ्यापासून गॅस निर्मितीबरोबरच उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत बनते. झुआरी कंपनी हे खत खरेदी करीत आहे. याशिवाय तीन हजार रुपये टनाप्रमाणे शेतकऱ्यांनाही थेट हे खत खरेदी करता येते. सोलापूर इंटसिटीवर असलेले इंजीन चालक देशमुख यांनी आपल्या लांबोटी येथील शेतात या कंपोस्ट खतावर केळीची बाग चांगल्या प्रकारे फुलविली आहे.



 

Web Title: One and a half MW electricity generation every day from the waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.