कुर्डूवाडीच्या कोविड सेंटरमधून वर्षभरात दीड हजारा बाधित रुग्ण उपचार घेऊन परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:21 AM2021-04-06T04:21:10+5:302021-04-06T04:21:10+5:30
येथील सेंटरवर प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम खाडे व त्यांचा आठजणांचा कर्मचारी वर्ग दिवस-रात्र रुग्णांची सेवा करण्यात मग्न आहेत. ...
येथील सेंटरवर प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम खाडे व त्यांचा आठजणांचा कर्मचारी वर्ग दिवस-रात्र रुग्णांची सेवा करण्यात मग्न आहेत. माढा तालुक्यामध्ये ७ जुलै २०२० रोजी कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने कुर्डूवाडी येथे संकेत मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटर शासनाकडून सुरू केले. २३ नोव्हेंबरपर्यंत त्या ठिकाणी ते चालले व त्यातून ७५९ रुग्णांना सेवा मिळाली. तालुक्यातील एकमेव हे केअर सेंटर असून, येथे तालुक्यातील प्रत्येक गावातून आर्टिफिशिअल व रॅपिड टेस्टद्वारे तपासणी केल्यानंतर बाधित रुग्ण उपचारासाठी येेथे दाखल होतात.
या सेंटरमध्ये पहिल्या दिवसापासून सेंटरचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम खाडे यांच्यासह पूजा वाघमारे, शारदा पवार या दोन आरोग्यसेविका, सचिन झोंबाडे, अक्षय लोखंडे हे दोन कक्ष सेवक, शिवराम चांदणे, दीपक चांदणे, अक्षय पवार, अतुल धडे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे साफसफाई करण्यासाठी चार कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ निखिता खरात व औषध निर्माता प्रिया शिंदे या येेेथे कार्यरत आहेत.
बाधित रुग्णांवरील उपचार प्रक्रिया
एखाद्या गावात पेशंट आढळल्यास त्यास सेंटरमध्ये दाखल केले जाते. त्यानंतर त्यांच्या रक्त, सीबीसीसह अन्य तपासण्या करीत दररोज त्यांची ऑक्सिजनची तपासणी केली जाते. जर एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन कमी प्रमाणात दिसू लागले तर त्याला लागलीच इतरत्र हलविण्याचेही काम शासकीय रुग्णवाहिकेद्वारे हे पथक कायम करीत आहे. बाधित रुग्ण व्यवस्थित झाल्यानंतर दहा दिवसांनंतर हे पथक डिस्चार्ज देऊन त्यांना अगदी ठणठणीत करून सोडण्यात येते.
फोटो
०५कुर्डूवाडी०१
ओळी
कुर्डूवाडी येथील श्रीराम मंगल कार्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची तपासणी करताना डॉ. शुभम खाडे व त्यांचे पथक.