एक बैल मारायला अन् दुसरा वाचवायला आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:23 AM2021-07-31T04:23:11+5:302021-07-31T04:23:11+5:30
फुलारी यांनी बोरगाव येथे वडिलोपार्जित शेती सुधारून बागायत केली आहे. अख्खे कुटुंब शेतात कसते. अल्पावधीतच त्यांनी या भागात नावलौकिक ...
फुलारी यांनी बोरगाव येथे वडिलोपार्जित शेती सुधारून बागायत केली आहे. अख्खे कुटुंब शेतात कसते. अल्पावधीतच त्यांनी या भागात नावलौकिक मिळवला आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी जुने बैल विकून नवीन तरुण दोन बैल खरेदी केले आहेत. सकाळी नेहमीच्या सवयीप्रमाणे चारापाणी करण्यासाठी रमेश फुलारी शेतात गेले. दोन्ही बैलांना चरायला सोडले. तेव्हा एक बैल त्यांच्या अंगावर धावून येत असताना फुलारी यांनी त्याचे शिंग पकडले. तेव्हा खाली पाडून बैलाने मारण्यास सुरवात केली. आजूबाजूला कोणीच नव्हते. जीवाच्या आकांताने आरडाओरडा करताना दुसरा बैल धावून आला. दोन्ही बैलांमध्ये जुंपली. फुलारी यांनी जीव वाचवण्यासाठी उभ्या पिकाचा आसरा घेतला.
----
कुटुंब दहशतीखाली
घाबरलेले रमेश पुजारी उभ्या पिकात लपून बसले. तेथूनच गावाकडे भाऊ मल्लिनाथ यांना मोबाईनवरून सारा प्रकार सांगितला. तत्काळ व्हॅन आणून त्यांना वागदरी येथे उपचार करून घेतले. या दिवसांपासून फुलारी कुटुंब आजही दहशतीखाली आहे.
----
गेल्या १५ वर्षांपासून न चुकता फुलबागेतून फुले आणून अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात पूजेला आणून देऊनच उर्वरित फुलांची विक्री करीत असतो. शेतात एकटाच असताना बैलाने माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. केवळ स्वामींच्या कृपेमुळे दुसरा बैल धावत आला आणि वाचलो.
- रमेश फुलारी, शेतकरी
----
फोटोओळ
फुलारी यांच्या शेतातील मारायला आलेला अन् सोडवायला आलेला बैल.