बाभूळगावात आजारास कंटाळून एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:19 AM2020-12-08T04:19:43+5:302020-12-08T04:19:43+5:30
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बाळासाहेब माने हे बार्शी बसस्थानकावर गोळ्या, बिस्किट विकत होते. लॉकडाऊन काळात त्यांचा व्यवसाय बंद ...
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बाळासाहेब माने हे बार्शी बसस्थानकावर गोळ्या, बिस्किट विकत होते. लॉकडाऊन काळात त्यांचा व्यवसाय बंद झाला. त्यातच त्यांचा मुलगा अपघातात मयत झाला. आता आपले कसे होणार, याची काळजी करत असल्याने त्यात त्यांना आजार जडला. त्या आजाराला कंटाळून त्यांनी
७ रोजी
२.३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. अडीच वाजताच्या दरम्यान माझ्या भावाचा मुलगा आनंद बाळासाहेब माने हा पळत आला व त्याने मला सांगितले, पप्पानी गळफास घेतला आहे. त्यानंतर मी जाऊन पाहिले असता माझा भाऊ बाळासाहेब यांनी झाडास गळफास घेतल्याचे दिसले, अशी माहिती प्रभाकर माने यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र मंगरुळे करीत आहेत.
फोटो आहे.
०७बाळासाहेब माने