हायवेवर चालकाला मारहाण करुन एक कोटीचे सिगारेट बॉक्स पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:24 AM2021-09-23T04:24:47+5:302021-09-23T04:24:47+5:30

पोलीस सूत्रांनुसार २१ सप्टेंबर रोजी मोहम्मद इम्तियाज मोहम्मद मुमताज (वय ३८, रा. गुरुब्रह्मानगर, हैदराबाद) हा टेम्पो चालक व त्याचा ...

One crore cigarette boxes were snatched by beating the driver on the highway | हायवेवर चालकाला मारहाण करुन एक कोटीचे सिगारेट बॉक्स पळवले

हायवेवर चालकाला मारहाण करुन एक कोटीचे सिगारेट बॉक्स पळवले

Next

पोलीस सूत्रांनुसार २१ सप्टेंबर रोजी मोहम्मद इम्तियाज मोहम्मद मुमताज (वय ३८, रा. गुरुब्रह्मानगर, हैदराबाद) हा टेम्पो चालक व त्याचा साथीदार मोहम्मद इस्माईल हे दोघे (एपी २२/ एटी २९७२) या टेम्पो मधून २५० सिगारेटचे बॉक्स घेऊन पुण्याकडे निघाले होते. हा ट्रक टेंभुर्णी हद्दीतील अहमदनगरकडे जाणाऱ्या रोडवरील ब्रीज ओलांडून टेंभुर्णी शहराच्या पश्चिम बाजूस २ ते ३ कि. मी .अंतरावर आला. तेथे ६ ते ७ अनोळख्या इसमांनी या टेम्पोला अडवले. टेम्पो चालक व त्याच्या साथीदारांना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली.

अज्ञात चोरट्यांनी रोडरॉबरी करून पळवून नेलेल्या २५० सिगारेटच्या बॉक्सची किंमत ९९ लाख ३७ हजार १७५ रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत ट्रक चालक मोहम्मद इम्तियाज याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

----

चालक-साथीदाराला टेम्पोतून उतरवले

अज्ञात चोरट्यांनी टेम्पोला अडवून टेम्पो चालक व त्याच्या साथीदारास खाली उतरण्यास भाग पाडले. सिगारेटचे बॉक्स भरलेल्या टेंपो घेऊन पसार झाले. नंतर हा टेम्पो घटना घडलेल्या ठिकाणापासून इंदापूर शहराच्या पश्चिमेस पंचवीस ते तीस किमी अंतरावर रिकाम्या अवस्थेत आढळून आला. तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

---

तपासासाठी चार तुकड्या रवाना

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिसांच्या पाच तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे करीत आहेत.

----

Web Title: One crore cigarette boxes were snatched by beating the driver on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.