उडगी हायस्कूलचा निकाल शंभर टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:16 AM2021-07-21T04:16:22+5:302021-07-21T04:16:22+5:30
उडगी : अक्कलकोट तालुक्यात उडगी हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. या हायस्कूलमधून धनश्री ओंकारेप्पा हारकुड हिने ९७.४० टक्के ...
उडगी : अक्कलकोट तालुक्यात उडगी हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. या हायस्कूलमधून धनश्री ओंकारेप्पा हारकुड हिने ९७.४० टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक पटकावला.
उडगी हायस्कूलमधून एकूण १०३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विशेष श्रेणीत ४३ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ५६ तर द्वितीय श्रेणीत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत द्वितीय क्रमांक नागेश रमेश कुसेकर (९५.६० टक्के) तर तृतीय वैष्णवी गणेश नारायणकर (९१ टक्के) चौथा प्रतीक्षा शरणबसप्पा यळसंगी (९०.४०), पाचवा कल्लप्पा नीलकंठ माशाळे (८८.८०) तर कन्नड माध्यमातून प्रथम वैष्णवी बसवराज कोळी (८६.४०), द्वितीय सतीश मल्लिनाथ कुंभार (८२), तृतीय श्रीकांत रमेश पुजारी (८१.२०) यांनी यश संपादन केले आहे. शालेय चेअरमन सिद्रमप्पा हारकूड, सचिव हणमंतप्पा कात्राबाद, सोसायटी चेअरमन ओंकारेप्पा हारकूड , मुख्याध्यापक एम. ए. पटेल, संतोष बिराजदार, संजय जानराव, नागेंद्र नारायणकर, गेनसिद्ध यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
________
फोटो ओळख
२० धनश्री हारकूड
२० नागेश कुसेकर
२० वैष्णवी नारायणकर