सांगोल्यात एक लाख नागरिकांचे लसीकरण झाले पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:28 AM2021-09-16T04:28:33+5:302021-09-16T04:28:33+5:30
राज्यात सोलापूर जिल्हा लसीकरणाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असला तरी सांगोला तालुका लोकसंख्येच्या तुलनेत मागे आहे. आतापर्यंत १ लाख ...
राज्यात सोलापूर जिल्हा लसीकरणाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असला तरी सांगोला तालुका लोकसंख्येच्या तुलनेत मागे आहे. आतापर्यंत १ लाख २ हजार २९ नागरिकांचे लसीकरण झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. यामध्ये फ्रन्टलाइन व हेल्थ वर्कर ८७८४ अधिकारी-कर्मचारी असून, ६० वर्षांवरील २९ हजार ४९, ४५ ते ५९ या वयातील २८ हजार ४२५, ४५ ते ४९ कोमाब्रेड (दुर्धर आजार) २ हजार १४, ३० ते ४४ या वयातील १४ हजार ६८०, तर १८ ते ३० वयातील १८ हजार ८७७ लाभार्थींचे लसीकरण झाले आहे.
सांगोला शहर व तालुक्यात मोठ्या संख्येने नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. पंचायत समिती स्तर, नगरपालिका कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींना वंचित नागरिकांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे, तरच लसीकरण मोहीम यशस्वी होईल, अन्यथा सांगोला कोरोनामुक्तीपासून दूरच राहणार आहे.