वीजबिल माफ न केल्यास एक लाख ग्राहकांचा मोर्चा काढणार; वंचित बहुजन आघाडीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 02:16 PM2020-11-17T14:16:16+5:302020-11-17T14:16:57+5:30
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापुरात महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन
सोलापुर : वंचित बहुजन आघाडीच्यावतीनेसोलापूर शहर जिल्ह्यातल्या कोरोनाच्या लॉकडाऊन कालावधीमधील वीज बिल माफ झाले पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते तथा सो.म.पा.नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देत असताना नगरसेवक चंदनशिवे यांनी वीज बिल आठवडाभरमध्ये माफ न झाल्यास एक लाखाचा मोर्चा काढणार असा इशारा दिला. या आंदोलनावेळी वीज बिल माफ करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या जुनी मिल येथील महावितरण कार्यालयांमध्ये घोषणाने परिसर दणाणून गेला.
या ठिय्या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष नगरसेवक गणेश पुजारी, महिला शहरअध्यक्ष नगरसेविका ज्योती बमगुंडे, जिल्हा कोषाध्यक्ष बबन शिंदे, युवा शहराध्यक्ष गौतम महाराज चंदनशिवे, बाळासाहेब तांबे, विजय बमगुंडे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भडकुंबे, महिला उपाध्यक्ष मंदाकिनी शिंगे, हेमलता वाघमारे, सुजाता वाघमारे, चाचा सोनवणे, अनिरुद्ध वाघमारे, रवी थोरात, विनोद इंगळे, सुहास सावंत, सुरज गायकवाड, अभिजीत गायकवाड, सिक्ंदर कांबळे, ॲड.मलिक कांबळे, शेरा मोकाशी, विशाल सर्वगोड, अमर वाघमारे आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.