जिल्ह्यातील एक लाख कामगारांना मिळणार सरासरी ७ टक्के दिवाळी बोनस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 01:14 PM2020-10-30T13:14:32+5:302020-10-30T13:17:09+5:30

दिवाळीच्या तोंडावर वाटप सुरू; कामगार संघटनांकडून १५ टक्क्यांची मागणी

One lakh workers in the district will get an average of 7% Diwali bonus | जिल्ह्यातील एक लाख कामगारांना मिळणार सरासरी ७ टक्के दिवाळी बोनस

जिल्ह्यातील एक लाख कामगारांना मिळणार सरासरी ७ टक्के दिवाळी बोनस

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कारखानदारांनी सरासरी सात टक्क्यांपेक्षा अधिक बोनस द्यायला असमर्थता दर्शविलीकोरोनामुळे सोलापुरातील उद्योग क्षेत्र पूर्णपणे ठप्प झाले होते. जवळपास ५ महिने उद्योग क्षेत्र बंद होते

सोलापूर : दिवाळी उंबरठ्यावर आहे. दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बोनस वाटपादरम्यान कारखानदार आणि कामगार यांच्यात एक उत्साह असतो. यंदा तो उत्साह नाही. तरीपण कारखानदार मोठ्या मनाने दिवाळी बोनस वाटप करत आहेत. जिल्ह्यात एक हजाराहून अधिक कारखान्यांमध्ये बोनस वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे. काही कारखानदारांनी आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात वाटप सुरू केली तर काही कारखानदार ५ आॅक्टोबरपासून दिवाळी बोनस वाटप सुरू करणार आहेत. सरासरी ७ टक्के बोनस वाटप होईल.

यंत्रमाग कामगारांना दिवाळी आणि दस?्याच्या पार्श्वभूमीवर बोनस वाटप सुरू आहे. काहींना दस?्याच्या पूर्वसंध्येलाच बोनस दिला गेला, तर काहींना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बोनस वाटप होणार आहे. यंत्रमाग कामगार संघटनांनी यंदा १५ टक्के दिवाळी बोनस देण्याची मागणी केली आहे. लवकरच यासंदर्भात सहायक कामगार आयुक्त, कामगार संघटना प्रतिनिधी तसेच यंत्रमागधारक संघ यांच्यात संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत कामगारांना किती टक्के बोनस द्यायचा यासंदर्भात तोडगा निघणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कारखानदारांनी सरासरी सात टक्क्यांपेक्षा अधिक बोनस द्यायला असमर्थता दर्शविली.

दिवाळी उत्साहात जाईल...
कोरोनामुळे सोलापुरातील उद्योग क्षेत्र पूर्णपणे ठप्प झाले होते. जवळपास ५ महिने उद्योग क्षेत्र बंद होते. मागील दोन महिन्यांपासून उद्योग पूर्वपदावर येतोय. त्यामुळे कारखानदारांसह कामगारांनाही रोजी-रोटी मिळतेय, त्यामुळे दसरा उत्साहात गेला. आता दिवाळीदेखील उत्साहात जाईल.
.........

जिल्ह्यातील उद्योजक दिवाळी बोनससंदर्भात सकारात्मक आहेत. आमच्या कंपनी ?क्?टनुसार आम्ही बालाजी अमाईन्समध्ये जास्तीत जास्त २० टक्के बोनस देत आहोत.
- राम रेड्डी
कार्यकारी संचालक -बालाजी अमाईन्स

-------------
कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून यंत्रमाग उद्योग बंद होता. आता कुठे यंत्रमाग उद्योग पूर्वपदावर येतोय. यंत्रमाग उद्योजक प्रचंड संकटात आहेत. त्यामुळे सरासरी सहा ते सात टक्के याप्रमाणे बोनस वाटप सुरू आहे. काहींनी दस?्यात बोनस दिला, तर आता काही उद्योजक दिवाळी बोनस वाटप करणार आहेत.
- पेंटप्पा गड्डम
अध्यक्ष, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ

Web Title: One lakh workers in the district will get an average of 7% Diwali bonus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.