एकाच रात्रीत सांगोल्यात चार दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:22 AM2020-12-22T04:22:20+5:302020-12-22T04:22:20+5:30

सांगोला : एकाच रात्रीत सराफाच्या दुकानासह भुसार बाजारातील चार दुकाने फोडून चाेरट्यांनी १ लाख ५७ हजार ५०० रुपये किमतीचा ...

In one night, four shops were blown up in Sangola | एकाच रात्रीत सांगोल्यात चार दुकाने फोडली

एकाच रात्रीत सांगोल्यात चार दुकाने फोडली

Next

सांगोला : एकाच रात्रीत सराफाच्या दुकानासह भुसार बाजारातील चार दुकाने फोडून चाेरट्यांनी १ लाख ५७ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज पळविला. या धटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली.

सांगोला बसस्थानकासमोर महालक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे सहा नंबर गाळ्यासमोर २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता दुकाने फोडलेली निदर्शनास आली. याबाबत सराफ व्यावसायिक अनिल बाबर यांनी सांगोला पाेलिसांत फिर्याद दिली आहे.

सराफ व्यावसायिक अनिल बाबर ( रा. जिव्हाळा कॉलनी, दत्तनगर, ता. सांगोला) यांचे बसस्थानकासमोरील कॉम्प्लेक्समधे सोने-चांदीचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी बाबर यांनी हुपरी (ता. हातकणंगले ) येथील व्यापाऱ्यांकडून ५ डिसेंबर रोजी चार किलो चांदीचे तयार दागिने विकत घेतले होते. त्यानंतर त्यांनी त्यापैकी अर्धा किलो चांदी विकली.

रविवारी रात्री ८च्या सुमारास चांदीचे दागिने ड्रॉव्हरमध्ये ठेवून दुकान कुलूप बंद करून घरी गेले. सोमवारी सकाळी १० च्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी आले असता शटरची दोन्ही कुलपे तुटलेली दिसून आली. त्यांनी तत्काळ मुलगा राकेश बाबर यास बोलावून घेतले. चोरट्यांनी पैंजण, जोडवी, कडली, ब्रासलेट, वाळे, तोडे आदी साडेतीन किलो दागिने पळविल्याचे त्यांच्या लक्षात आले.

---

...अन् चोरट्यांनी पळ काढला

बाबर यांचे दुकान रात्री फोडल्यानंतर चोरट्यांनी लगेच आपला मोर्चा शहरात शिवाजी चौकाकडे वळविला. येथे राजू ढोले व वसंत सुपेकर यांची भुसार दुकाने व मंडईनजीक असणारे सचिन भंडारे यांचे किराणा दुकान फोडून ऐवज पळवला. यादरम्यान काही तरुणांना चोरटे निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांशी फोनवर संपर्क साधला. इतक्यात सावध झालेल्या चोरट्यांनी तेथून पळ काढला.

Web Title: In one night, four shops were blown up in Sangola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.