Breaking: कोरोनाने सोलापुरात एकाचा मृत्यू; एकाच दिवशी आढळले ८ रूग्ण
By Appasaheb.patil | Published: March 14, 2023 06:59 PM2023-03-14T18:59:04+5:302023-03-14T19:01:09+5:30
कोरोनाने सोलापुरात एकाचा मृत्यू झाला असून एकाच दिवशी ८ रूग्ण आढळले आहेत.
सोलापूर : सोलापूर शहरात एकाच दिवशी ८ रूग्ण आढळून आले. दरम्यान, शहरातील एका ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अहवालात झाली आहे. सध्या सोलापुरातील कोरोना रूग्णांची संख्या १५ इतकी झाली आहे.
सोमवारी १२६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाला. त्यात रॅपिड ॲन्टीजेन टेस्टचे २८ तर आरटीपीसीआर टेस्ट ९८ जण होते. त्यापैकी ११८ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात तीन पुरूष तर ५ महिलांचा समावेश आहे.
मयत झालेली व्यक्ती ही बुबणे चाळ, रेल्वे लाईन परिसरातील आहे. मयताचे वय ८० असून त्यांना दमा, पक्षाघात असल्याने त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना ११ मार्च २०२३ रोजी पहाटे शासकीय रूग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोलापुरातील कोरोनाची रूग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे.