सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने 'एक सही संतापाची' अभियान

By संताजी शिंदे | Published: July 8, 2023 06:09 PM2023-07-08T18:09:34+5:302023-07-08T18:10:42+5:30

सध्या महाराष्ट्रातील गरुड राजकारण कोण कोणाबरोबर जाते?, कोण कुठल्या तत्वाला तीलांजली देते?

One signature outrage campaign on behalf of Maharashtra Navnirman Sena | सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने 'एक सही संतापाची' अभियान

सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने 'एक सही संतापाची' अभियान

googlenewsNext

संताजी शिंदे-सोलापूर

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच सही संतापाची हे अभियान राबविण्यात आले. अभियानाचे उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. 

सध्या महाराष्ट्रातील गरुड राजकारण कोण कोणाबरोबर जाते?, कोण कुठल्या तत्वाला तीलांजली देते? याचं नेमकं हिंदुत्व कुठे नक्की गेले?. सत्तेसाठी कोणी काही करायला लागले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे. जनतेला खोटी आश्वासने देऊन सगळे लोकप्रतिनिधी निवडून आले. निवडणुकीच्या वेळी जे वचने दिली होती, त्याला हरताळ फासण्याचं काम सध्याच्या राजकर्त्यांनी केले. म्हणून महाराष्ट्रातील जनतेमध्ये दुसरे काय नाही. सर्व पक्षांनी लोकांचा भ्रमनिरश केल्यामुळे प्रचंड संताप आहे. आज जे महाराष्ट्रात मध्ये गढुळ वातावरण चालू आहे, या वातावरणाचा संताप व्यक्त करण्यासाठी हे अभियान राबवण्यात आले.

लोकांनी एक सही संतापाची म्हणून अभियानात सहभाग घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, उपजिल्हा अध्यक्ष सत्तार सय्यद, मनविसे जिल्हा अध्यक्ष अभिषेक रंपुरे, वाहतुक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभूर्णीकर, राहुल अकलवाडे, पवन देसाई, गोविंद बनपट्टे, यश महिंद्रकर, वैभव रंपूरे, रवी स्वामी, सैफण जमखंडी, जयश्री हिरेमठ, रूपाली माळवदकर, शोभा साठे, ओंकार वाले, आदित्य महेंद्रकर, आदर्श पाटील, मनोज अंजीखाणे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: One signature outrage campaign on behalf of Maharashtra Navnirman Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.