एक हजार गडप्रेमी करणार चंद्रभागा अन् भुईकोट किल्ल्याची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:31 AM2020-02-26T11:31:21+5:302020-02-26T11:35:56+5:30

अखंड राजा शिवछत्रपती परिवाराचा उपक्रम; वृक्षारोपन करून गड किल्ले संवर्धनाविषयी करणार जनजागृती

One thousand thunderstorms will clean the Chandrabhaga and Bhuikot fort | एक हजार गडप्रेमी करणार चंद्रभागा अन् भुईकोट किल्ल्याची स्वच्छता

एक हजार गडप्रेमी करणार चंद्रभागा अन् भुईकोट किल्ल्याची स्वच्छता

googlenewsNext
ठळक मुद्देस्वच्छता आणि वृक्षारोपण आणि गडकिल्ल्याच्या संवर्धनाबद्दल जनजागृती करण्यात येणार पंढरपुरातील वीरपत्नी आणि वीरमातांचा सत्कार करण्यात येणार मागील साडेपाच वर्षांपासून महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांत दुर्ग स्वच्छता मोहीम

सोलापूर : अखंड राजा शिवछत्रपती परिवाराकडून सोलापुरातील भुईकोट किल्ल्याची स्वच्छता करण्यात येणार आहे़ एक मार्च रोजी सकाळी आठ वाजता भुईकोट किल्ल्याची स्वच्छता करण्यात येईल़ त्यापूर्वी २९ फेब्रुवारी रोजी सकाळी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची स्वच्छता करण्यात येणार आहे़ या मोहिमेत राज्यभरातील एक हजार गडप्रेमी, शिवप्रेमी सहभागी होणार आहेत़ या स्वच्छता मोहिमेत सोलापूरकरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अखंड राजा शिवछत्रपती परिवाराचे अध्यक्ष आशिष घोरपडे यांनी केले आहे.

अखंड राजा शिवछत्रपती परिवार मागील साडेपाच वर्षांपासून महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांत दुर्ग स्वच्छता मोहीम राबवत आहे़ २९ फेब्रुवारीला परिवारातील कार्यकर्त्यांचे पंढरपूर येथे आगमन होणार आहे़ शनिवार, दि़ २९ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता चंद्रभागा नदी स्वच्छता मोहिमेला सुरुवात होणार आहे़ दोन तास स्वच्छता मोहीम झाल्यानंतर पंढरपूर शहरातून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे़ स्वच्छता आणि वृक्षारोपण आणि गडकिल्ल्याच्या संवर्धनाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे़ दुपारी तीन वाजता पंढरपुरातील वीरपत्नी आणि वीरमातांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती आशिष घोरपडे यांनी दिली.

अखंड राजा शिवछत्रपती...
- शनिवारी सायंकाळी सहा वाजता अखंड राजा शिवछत्रपती परिवारातील सदस्यांचे सोलापुरात आगमन होणार आहे. सायंकाळी सात वाजता शिवस्मारक येथून हुतात्मा चौकापर्यंत जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे़ सर्व सदस्यांचा मुक्काम मराठा मंदिर हॉल येथे असेल़ रविवार दि़ १ मार्च रोजी सकाळी सर्व गडप्रेमी भुईकोट किल्ल्यात एकत्र येणार आहेत.सकाळी सात वाजता ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र होईल़ आठ वाजता स्वच्छतेला सुरुवात होणार आहे़ दुपारी दीडपर्यंत भुईकोट किल्ल्याची स्वच्छता करण्यात येणार आहे़ त्यानंतर ४ वाजता सर्व गडप्रेमींना निरोप देण्यात येणार आहे़ या स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आशिष घोरपडे यांनी केले आहे़

Web Title: One thousand thunderstorms will clean the Chandrabhaga and Bhuikot fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.