एकाला वीटभट्टीवर तर दुसऱ्याला शेतात काम करताना सापानं डंख मारला

By विलास जळकोटकर | Published: August 14, 2023 06:25 PM2023-08-14T18:25:22+5:302023-08-14T18:25:34+5:30

सोमवारी सकाळी एकाला शेतामध्ये काम करताना तर दुसऱ्याला वीटभट्टीवर काम करताना सापानं डंख मारल्याने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे लागले.

One was bitten by a snake while working in the brick kiln and the other in the field | एकाला वीटभट्टीवर तर दुसऱ्याला शेतात काम करताना सापानं डंख मारला

एकाला वीटभट्टीवर तर दुसऱ्याला शेतात काम करताना सापानं डंख मारला

googlenewsNext

सोलापूर: पावसाळ्यात साप चावण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी सकाळी एकाला शेतामध्ये काम करताना तर दुसऱ्याला वीटभट्टीवर काम करताना सापानं डंख मारल्याने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे लागले. दामोधर जालिंदर जाधव (वय- ५४, रा. पीर टाकळी, ता. मोहोळ) तर काशिनाथ वसंत चव्हाण (वय ५२, रा. तीर्थ ता. द. सोलापूर) असे साप चावलेल्या दोघांची नावे आहेत. यातील दामोधर जालिंदर जाधव हे ग्रहस्थ सोमवारी सकाळी १० च्या सुमारास पिरटाकळी येथील स्वत:च्या शेतात काम करीत होते.गवतामध्ये सापावर पाय पडल्याने पायाला डंख मारला. मुलगा शरद याने लागलीच शासकीय रुग्णालयात दाखल केले.

दुसऱ्या घटनेमध्ये सोमवारी सकाळी काशिनाथ वसंत चव्हाण (वय- ५२, रा. तीर्थ) हे वळसंग गावाजवळ वीटभट्टीवर काम करीत होते. अचानक सापानं हाताला चावा घेतला. खासगी दवाखान्यात दाखवून सोलापूरला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भाऊ बहाद्दूर चव्हाण यांनी दाखल केले. यातील दोघेही शुद्धीवर असून, उपचार सुरु आहेत. सिव्हील चौकीत या घटनांची नोंद आहे.
 

Web Title: One was bitten by a snake while working in the brick kiln and the other in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.