कांद्याच्या भावात पुन्हा अडीचशेची वाढ; एका दिवसात हजारो ट्रॅक माल बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 05:32 PM2022-02-03T17:32:16+5:302022-02-03T17:32:21+5:30
८८० ट्रक आवक : लिलाव दररोज सुरू राहणार
सोलापूर : बाजार समितीत बुधवारी कांद्याची ८८० ट्रक आवक झाली. आवक जास्त असतानाही कांद्याच्या भावात पुन्हा बुधवारी अडीचशे रुपयांनी वाढ झाली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक जास्त प्रमाणात होत आहे. ३१ जानेवारीला ८४६ ट्रक कांदा आला होता. जास्तीजास्त २६०० भाव मिळाला होता. कांद्याचे यार्ड रिकामे करण्यासाठी मंगळवारी लिलाव बंद ठेवण्यात आले होते. यार्ड रिकामे झाल्यावर बुधवारी लिलाव सुरू करण्यात आले.
आजही बार्शी, मोहोळ तालुक्याबरोबरच भूम, परंडा तालुक्यातून कांद्याची मोठी आवक झाली. त्यामुळे लिलाव उशिरापर्यंत चालले. प्रतिक्विंटल कमीतकमी १३५०, तर जास्तीजास्त २८५० रुपये कांद्याला भाव मिळाला. सोलापूर बाजारपेठेत कांद्याला चांगला भाव मिळत आहे. व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. लिलाव झालेला कांदा तातडीने हलविण्यासाठी बाजार समितीतर्फे व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आज, गुरुवारपासून लिलाव पूर्वतत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जानेवारीत तीनवेळा कांद्याची विक्रमी आवक झाली. त्यामुळे बाजार समितीचे लिलाव थांबवून कांदा हलविण्यात आला होता. फेब्रुवारीतही चांगली सुरुवात झाली आहे. नवीन तुरीच्या दरातही पुन्हा शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन तूर : ५५०० ते ६१०० रु., पिंक : ५८०० ते ६४५०, सोयाबीन : ५४०५ ते ६०५५ रु.