सोलापुरात कांद्याच्या दरातील घसरण सुरूच; खरेदीदार व्यापाºयांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 05:03 PM2018-11-21T17:03:44+5:302018-11-21T17:08:35+5:30

घसरण सुरूच; खरेदीदार व्यापाºयांची घटली संख्या, केवळ १३७ टन आवक

Onion prices slip in Solapur; The number of buyers vendors declined | सोलापुरात कांद्याच्या दरातील घसरण सुरूच; खरेदीदार व्यापाºयांची संख्या घटली

सोलापुरात कांद्याच्या दरातील घसरण सुरूच; खरेदीदार व्यापाºयांची संख्या घटली

Next
ठळक मुद्देकांद्याची दररोजची आवक २८० ट्रकपर्यंत गेली दरात वाढ होत नसल्याने शेतकºयांपुढे अर्थसंकटकांदा विक्रीसाठी आणावा की नको?, असे शेतकरी विचार करु लागले

सोलापूर: सोलापूरबाजार समितीमध्ये कांद्याची आवक दररोज कमी होत असतानाही दरात वाढ होत नसल्याने शेतकºयांपुढे अर्थसंकट उभारले आहे. कांदा विक्रीसाठी आणावा की नको?, असे शेतकरी विचार करु लागले आहेत.

मागील आठवड्यापासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दराची घसरण सुरू आहे. कांद्याची आवक वाढल्यानंतर दराची घसरण सुरू राहणे स्वाभाविक आहे, मात्र आवक वरचेवर कमी होत असतानाही दर वाढत नाही. दिवाळी सणानिमित्तची सुट्टी संपल्यानंतर कांदा खरेदीसाठी व्यापाºयांची संख्या वाढते, असे सांगितले जाते. खरेदीदार व्यापाºयांची संख्या वाढल्याने खरेदीसाठी स्पर्धा होऊन दरातही वाढ होते, अशी एक धारणा आहे. मात्र सध्या तशी स्थिती नाही. मागील आठवड्यापासून कांद्याची दररोजची आवक २८० ट्रकपर्यंत गेली आहे.

कधी २८०, कधी २७०, कधी २४० याप्रमाणे कांद्याची आवक घसरत गेली आहे. सोमवारी २७० ट्रक तर मंगळवारी अवघा १३७ ट्रक कांद्याची आवक बाजार समितीमध्ये झाली होती. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी ५० टक्के कांदा विक्रीसाठी आला होता. असे असतानाही दरात वाढ झाली नाही. मागील आठवड्यापासून सुरू असलेला दराचा खेळ मंगळवारीही दिसून आला. एका शेतकºयाच्या काही निवडक कांद्याला क्विंटलला १७१० रुपये दर आला. अन्य कांदा मात्र १०० रुपयांपासून विक्री झाला. सरासरी ६०० रुपयेच दर राहिला. विशेष म्हणजे बुधवारी बाजाराला सुट्टी असल्याने शिवाय मंगळवारी कांद्याची आवक कमी झाल्याने अधिक दर मिळणे अपेक्षित होते. मात्र व्यापाºयांच्या एकीमुळे कांदा उत्पादक शेतकºयांचे मरण सुरू आहे. 

यावर्षी पाऊस नसल्याने पाण्याची टंचाई असताना असलेल्या पाण्यावर अन्य पिके टाळून केवळ कांदा पीक शेतकºयांनी जोपासना केली. केवळ कांद्याच्या विक्रीतून चार पैसे मिळतील ही शेतकºयांची अपेक्षा असताना कांदा बाजारात आणण्यासाठी होणारा वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. 

मजुरीही निघत नाही..
कांदा लागवडीसाठी लागणारे रोप, लागवडीसाठी होणारी मजुरी, त्यासाठी खत, फवारण्या, शेतकरी कुटुंबाचे श्रम, कांदा लागवडीसाठी होणारा खर्च व कांदा भरण्यासाठी आवश्यक पोती यांचा खर्च प्रत्येक शेतकºयाचा वेगवेगळा आहे. या खर्चाचा विचार करता सध्या मिळणारा दर पाहता खर्च न केलेला बरा. परंतु कांदा विक्रीसाठी होणारा वाहतूक खर्च, हमाली तोलाई व अन्य बाजार समितीमधील  खर्चही कांदा विक्रीतून निघत नाही. अशाने शेतकरी थोडाच नफ्यात येणार आहे?

मोजून कांद्याला पाणी दिले. कांद्याचे उत्पादन येण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करुन खर्च केला. आता कांदा बाजारापर्यंत घेऊन जायचेही परवडत नाही. क्विंटलला दीड हजारापेक्षा अधिक दर मिळाला तर किमान तोटा तरी होत नाही.
- घनशाम गरड, कांदा उत्पादक 

Web Title: Onion prices slip in Solapur; The number of buyers vendors declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.