बहिस्थ अभ्यासक्रमासाठी १५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:46 AM2020-12-05T04:46:45+5:302020-12-05T04:46:45+5:30
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत बहिस्थ विभागातील ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग होते, असे विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षात ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत बहिस्थ विभागातील ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग होते, असे विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षात उत्तीर्ण झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी प्रवेश दिला जाणार आहे; मात्र या विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी दोन वर्षांत पूर्ण करणे बंधनकारक राहील. त्यासंदर्भाचे हमीपत्र घेऊनच प्रवेश दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पेमेंट देखील करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर १६ डिसेंबर २०२० पर्यंत निवडलेल्या संबंधित बहिस्थ केंद्र, महाविद्यालय व विद्यापीठ येथे जमा करावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.